स्वामी म्हणतात या काही गोष्टी सोडा नाहीतर तुमचा नाश अटळ आहे!

मित्रांनो आपण देवाला नेहमीच नैवेद्य दाखवतो किंवा प्रसाद देतो. नैवेद्यामध्ये आपण विविध गोड पदार्थ देवाला अर्पण करतो. एखादी पूजा घातली असेल तर आपण घरामध्ये जे जे काही आपल्या पूजेसाठी केलेले आहे. ते सर्व अन्नप्रसाद म्हणून अर्पण करतो. त्यात एकच भाव असतो की, हे देवा हे जे अन्न आहे ते तुझ्या कृपेनेच मला मिळालेले आहे आणि त्याचा तो स्वीकार कर.

एकदा एका भावीकाने एका महाराजांना विचारले की आपण खातो ते अन्न आणि प्रसाद यामध्ये काय फरक असतो अन्न तेच तर असते आणि प्रसाद पण तोच असतो मग या दोघांमध्ये फरक तो काय? त्यावेळी त्या महाराजांनी त्या व्यक्तीला किंवा त्या भक्ताला दिलेल उत्तर खूप सुंदर आहे.

मित्रांनो महाराज किंवा साधू संत जे असतात ते चालते बोलते परमेश्वर असतात आणि ते जे बोलतात ते परम सत्य असते. हे आपल्याला यातून समजेल. अन्न व प्रसाद एकच आहे मात्र देवाला अर्पण केल्यावर त्याला प्रसाद का म्हणतात असा प्रश्न केलेल्या भक्ताला ते महाराज म्हणतात तुम्ही रस्त्याने जात आहात दुकानातून तुम्ही लाडू घेतले आहात. ते लाडू घेऊन जाताना वाटेत एखाद्या व्यक्तीने विचारले की यामध्ये काय आहे.

त्यावेळी तुम्ही त्या व्यक्तीला सांगतात की यामध्ये बुंदीचे लाडू आहेत. पण पुन्हा तुम्ही तेच बुंदीचे लाडू घेऊन कुठे चालला हे विचारल्यावर तुम्ही सांगता की मंदिरामध्ये चाललेलं आहोत. मात्र मंदिरामध्ये गेल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर परत घरी येताना एखाद्या व्यक्तीने तुम्हाला विचारले या हातामध्ये काय आहे.

त्यावेळी तुम्ही सांगता की हातामध्ये प्रसाद आहे. ज्यावेळी तुम्ही एखादी गोष्ट देवाला अर्पण करता देवाला नैवेद्य दाखवता त्यावेळी तुमच्यातला अहंकाररुपी मीपणा नष्ट होतो तो अहंकार रुपी मीपणा नष्ट करण्याचे काम सद्गुरु करतात. म्हणजे देव करतात. तुम्ही देवाला ज्यावेळी नैवेद्य दाखवता त्यावेळी तुमच्यातला अहंकार दूर होतो मीपण दूर होतो.

म्हणून आपल्यातला मी पण दूर करण्यासाठी भगवंताला शरण जायचे असते. भगवंताला शरण जाण्यासाठी विविध मार्ग सांगितलेले आहेत. त्यापैकी नैवेद्य दाखवणे हा एक त्या मागचा उद्देश आहे. ते भावाचा भुकेला आहे त्यात गरीब श्रीमंत असा भेद नाही. मात्र देव हेच म्हणतो की तुझा सुद्धा भाव मला अर्पण कर तुझा अहंकार सोड कारण अहंकार असलेल्या व्यक्तीला मी कधीच प्रसन्न होत नाही.

आपण बऱ्याचदा समाजामध्ये अनेक लोक बघतो काही लोक श्रीमंत असतात पैशाने खूप मोठे असतात. गाड्या बंगला खूप संपत्ती असते. मात्र अशा लोकांना कोणी सहसा विचारत नाही. या उलट एखादी व्यक्ती गरीब असेल ती सर्वांशी चांगले बोलत असेल सर्वांना आदर देत असेल त्या व्यक्तीला रस्त्याने जाताना अनेक लोक हात करतात.

याचा अर्थ हा आहे की तुम्ही किती पैशाने मोठे आहात हे गरजेचे नाही तुम्ही मनाने किती मोठे आहात यावर तुमचा मोठेपणा ठरत असतो. तुमच्यावर स्वामीकृपा अखंड राहो.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment