मित्रांनो, आपल्याला आपल्या घरामध्ये सुख शांती नांदावी असे वाटतच असते आणि त्यासाठी आपण वास्तुशास्त्रानुसार अनेक खूप सारे उपाय देखील करीत असतो. वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले उपाय जर तुम्ही केले तर आपल्या घरामध्ये कोणतीही वाद-विवाद होणार नाहीत. तसेच आपले घर कायमच प्रसन्नतेचे राहते. तसेच आज मी तुम्हाला अशा काही मूर्ती सांगणार आहे या मूर्ती जर तुम्ही घरामध्ये ठेवल्या तर यामुळे तुमच्या घरामध्ये कायम सुख शांती नांदेल.
कोणतेही संकट येणार नाही. तसेच अनेक व्यक्ती अडचणीमध्ये असतात आणि त्यामुळे घरामध्ये मग शांतता राहत नाही त्यावेळेस तुम्ही या मूर्ती अवश्य आपल्या घरामध्ये ठेवणे गरजेचे आहे. तर या मूर्ती नेमक्या कोणत्या आहेत चला तर मग जाणून घेऊयात.
तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी हवी असेल तर तुम्ही आपल्या घरामध्ये हत्तीची मूर्ती अवश्य ठेवावी. हत्तीला धन आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे सुख समृद्धी प्रधान करण्यासाठी हत्तीची मूर्ती घरात ठेवणे खूपच महत्त्वाचे मानले जाते आणि ही हत्तीची मूर्ती तुम्ही उत्तर किंवा ईशान्य दिशेला ठेवणे खूपच शुभ मानले गेलेले आहे.
आपल्याला हत्तीची मूर्ती ठेवणे शक्य नसेल तर हत्तीचा फोटो देखील लावू शकता. राजहंस हंसाला प्रेम आणि शांतीचं प्रतीक मानलं जातं. हंसाच्या जोडीची मूर्ती मुख्य खोलीत किंवा हॉलमध्ये ठेवली तर आर्थिक फायदे मिळतात. याशिवाय घरात प्रेम आणि शांततेचं वातावरण तयार होतं.
तसेच तुम्ही घरामध्ये कासवाची मूर्ती ठेवली तर पती-पत्नीचे संबंध प्रेमळ बनतात असे मानले जाते. कासव घरामध्ये कासव असणं अतिशय शुभ मानले जाते. काही लोक फिश टॅंकमध्ये देखील कासव ठेवतात. पौराणिक कथांनुसार कासवाला विष्णूचं रूप मानलं जातं आणि त्यामुळे अनेकांना घरामध्ये कासव ठेवायला आवडतं.
घरात जिवंत कासव ठेवणं अशक्य आहे. त्यामुळेच उत्तर दिशेला कासवाची मूर्ती ठेवू शकतात. यामुळे आपल्या घरामध्ये शुभ परिणाम आपणाला पाहायला मिळतात. तसेच घरामध्ये मुख्य खोलीमध्ये दरवाजाकडे तोंड करून तुम्ही कासवाची धातूची मूर्ती ठेवणे हे खूपच उत्तम मानले गेलेले आहे.
तसेच घरामध्ये पोपटाची मूर्ती ठेवण प्रेम आणि समृद्धीचं प्रतीक मानले जाते. यामुळे घरात पॉझिटिव्ह एनर्जी वाढते. पोपटाची मूर्ती किंवा फोटो मुलांच्या खोलीमध्ये लावल्याने त्यांची एकाग्रता वाढून अभ्यासामध्ये मन लागतं. घरात पोपट पाळणं किंवा पोपटाची मूर्ती ठेवली तर वैभव वाढायला सुरुवात होते. घरातील वातावरण आनंदी राहतं, असं मानलं जातं.
तर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे तुम्ही या मूर्ती आपल्या घरामध्ये अवश्य ठेवा. यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल. तसेच या मूर्ती आपणासाठी खूपच शुभ देखील ठरतात.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.