देवशयनी आषाढी एकादशी येण्याआधी घरात ‘या’ दिवशी करावी सत्यनारायणाची पूजा, घरात सुख समृद्धी नांदेल!

मित्रांनो आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये अनेक प्रकारचे माहिती उपाय आपल्याला पाहायला मिळतात. तसेच या माहितीवरून आपल्याला जीवनामध्ये खूपच फायदा देखील होत असतो. तर हिंदू धर्मामध्ये अनेक सण उत्सव तसेच अनेक दिवसांचे विशेष असे महत्त्व आहे. म्हणजेच अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, एकादशी असेल तरी या सर्वांचे महत्त्व हे आपल्याला शास्त्रामध्ये पाहायला मिळते.

देवशयनी आषाढी एकादशी ही 29 जून म्हणजेच गुरूवारच्या दिवशी आलेली आहे. देवशयनी आषाढी एकादशी ही सर्व एकादशीमध्ये खूपच मोठी मानली जाते. तसेच या एकादशीला खूप महत्त्व देखील आहे. तर देवशयनी आषाढी एकादशीपासून चार महिने देव हे योगनिद्रेत गेलेले असतात. त्यामुळे या चार महिन्यांमध्ये कोणतेही शुभकाम आपण करावयाचे नाही.

म्हणजेच देवशयनी आषाढी एकादशी अगोदर जी काही तुमची महत्त्वाची कामे असतील ते पूर्ण करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही देवशयनी आषाढी एकादशी येण्याआधी आपल्या घरामध्ये सत्यनारायणाची पूजा अवश्य करावी. यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्य याची कमतरता भासत नाही. तसेच घरामध्ये सुख-समृद्धी देखील नांदेल.

आषाढी एकादशी अगोदर घरात कोणत्याही दिवशी म्हणजेच शुभ दिवशी सत्यनारायणाची पूजा करायची आहे. जर तुम्ही कोणत्याही ज्योतिषणा बोलवता घरातल्या घरात साध्या सोप्या पद्धतीने सत्यनारायणाची पूजा करू शकता. म्हणजेच एखादा चौरंग मांडून तसेच विधिवतपणे सर्व साहित्य आणून ते सर्व साहित्य व्यवस्थितपणे मांडून नंतर कुबेरांचा फोटो चौरंगावर ठेवून जर सत्यनारायणाची कथेची पुस्तक तुमच्याजवळ असेल तर ती कथा वाचायची आहे आणि ही सत्यनारायणाची पूजा आपण घरच्या घरी करू शकता.

तर ही पूजा म्हणजेच सत्यनारायणाची पूजा शुभ दिवशी करणे खूप गरजेचे आहे. म्हणजेच तुम्ही शनिवारी, सोमवारी, मंगळवारी किंवा गुरुवारच्या दिवशी म्हणजेच देवशयनी आषाढी एकादशी आहे त्या दिवशी देखील आपल्या घरामध्ये केली तरीही चालेल. परंतु देवशयनी आषाढी एकादशी येण्याआधी आपल्या घरामध्ये तुम्ही सत्यनारायणाची पूजा अवश्य घालायची आहे. यमुळे धनधान्य याची कमतरता भासणार नाही. माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये वास करेल.

Leave a Comment