१३ सप्टेंबरपासून पालटणार ‘या’ तीन राशीधारकांचे नशीब, शुक्र नक्षत्रामुळे अपार धनलाभ

 

ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्र ग्रहाला सुख समृद्धी, ऐश्वर्य, सौंदर्य, कला, संगीत आणि धन संपत्तीचा कारक मानले जाते. अशात शुक्र ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा थेट परिणाम राशीचक्रातील इतर बारा राशींच्या जीवनावर पडणार आहे. जर तुमच्या राशीच्या कुंडलीमध्ये शुक्राची स्थित मजबूत नसेल तर त्या लोकांच्या आयुष्यात चढ उतार दिसून येतात.

 

शुक्र वेळोवेळी राशीबरोबर नक्षत्र परिवर्तन सुद्धा करतो. शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाचा थेट परिणाम १२ राशींच्या लोकांच्या आयुष्यावरही दिसून येतो. या वेळी शुक्र हस्त नक्षत्रामध्ये सुद्धा विराजमान आहे. १३ सप्टेंबर रोजी ते चित्रा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. अशावेळी काही राशीच्या लोकांना याचा लाभ होऊ शकतो.

 

शुक्र १३ सप्टेंबर सकाळी ३ वाजता चित्रा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे आणि येथे २४ सप्टेंबर पर्यंत विराजमान राहील. चित्रा २७ व्या नक्षत्रांमधील १४ वे नक्षत्र आहे. या नक्षत्राचा स्वामी ग्रह मंगळ आहे आणि या नक्षत्राची रास कन्या आहे. शुक्र सध्या कन्या राशीमध्ये विराजमान आहे. त्यामुळे शुक्राचे नक्षत्र परिवर्तन अधिक प्रभावी ठरणार आहे.

 

कर्क राशी (Kark Zodiac)

या राशीमध्ये शुक्र तिसऱ्या स्थानावर विराजमान राहणार. अशावेळी या राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येईल. या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. याबरोबर या राशीच्या लोकांची कार्य क्षेत्रात प्रगती होईल. अशावेळी आपल्याला नशीबाची चांगली साथ मिळेल. विवाहित लोकांना सासरच्या लोकांकडून सहकार्य मिळेल. या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत राहीन. या लोकांचे आयुष्य सुख समृद्धीने भरलेले दिसून येईल. वरिष्ठांबरोबर चांगले संबंध निर्माण होईल. बहीण भावांबरोबर चांगला वेळ घालवू शकाल. जीवनात भरपूर आनंद नांदेल.

 

कुंभ राशी (Kumbha Zodiac)

कुंभ राशीच्या लोकांसाठी शुक्राचे नक्षत्र परिवर्तन लाभदायक ठरू शकते. या राशीमध्ये मंगळ पाचव्या स्थानावर विराजमान आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी शुक्राबरोबर मंगळ सुद्धा शुभ फळ देणारा ठरेल. करिअर क्षेत्रामध्ये या राशीच्या लोकांना फायदा होईल. या राशीच्या लोकांना पदोन्नती, अपार यश आणि चांगले रिटर्न मिळू शकते. जीवनातील सर्व संकटे दूर होतील. आठव्या स्थानी शुक्र असल्यामुळे आयुष्यात भरपूर आनंद मिळेल. व्यवसायात खूप चांगला नफा मिळेल.

 

कन्या राशी (Kanya Zodiac)

  1. कन्या राशीच्या लग्न भावात शु्क्र देव विराजमान आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांच्या आयुष्यात भरपूर आनंद दिसून येईल. कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकतील. अडकलेली कामे मार्गी लागतील. या राशीच्या दहाव्या स्थानावर मंगळ विराजमान आहे. अशात या राशीच्या लोकांना चांगला धनलाभ, करिअरमध्ये लाभ मिळू शकतो. व्यवसायात चांगला नफा मिळेल. पैसा कमावण्याचे नवीन स्त्रोत मिळतील. जीवनातील कष्ट दूर होतील. अविवाहितांना लग्नाचे योग जुळून येतील. जोडीदाराबरोबर नाते दृढ होतील.

Leave a Comment