१० दिवसांनंतर मिळणार नुसता पैसा; ‘मालव्य राजयोग’ देणार ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात पैसा आणि प्रतिष्ठा

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या राशी परिवर्तनाने अनेकदा राजयोग, शुभयोगांची निर्मिती होते. ज्याच्या प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींना भौतिक सुखाची प्राप्ती होते. १८ सप्टेंबर रोजी जवळपास एक वर्षानंतर शुक्र आपली स्वराशी असलेल्या तूळ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र ग्रहाच्या या राशी परिवर्तनाने मालव्य राजयोग निर्माण होत आहे. ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला संपत्ती, समृद्धी, सुख आणि भौतिक सुखाचा कारण ग्रह मानले जाते. त्यामुळे शुक्राचे हे राशी परिवर्तन काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायी ठरेल.

 

शुक्र निर्माण करणार मालव्य राजयोग (Shukra Gochar 2024)

तूळ

 

तूळ राशींच्या व्यक्तींसाठी मालव्य राजयोग खूप शुभ फळ देईल. या काळात तुमच्या भौतिक सुखात वाढ होईल. आकस्मिक धनलाभ होतील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील. अडकलेले पैसे परत मिळतील. नव्या नोकरीची ऑफर मिळेल. कुटुंबात शुभ कार्ये होतील. मार्केटिंग, मीडिया, बँक व शिक्षण या क्षेत्रांतील व्यक्तींना यश मिळेल. तुमच्या मान-सन्मात वाढ होईल.

 

मकर

 

मकर राशीच्या व्यक्तींसाठी मालव्य राजयोग खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. प्रत्येक कामात सहज यश प्राप्त कराल. कुटुंबीयांबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील. व्यवसाय करणाऱ्यांना धनलाभ होईल. नव्या वस्तू खरेदी कराल. तीर्थक्षेत्राला भेट द्याल. आर्थिक चणचण दूर होईल; तसेच वायफळ खर्च थांबतील. मुलांसोबत सहलीला जाल.

 

कुंभ

 

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी मालव्य राजयोग खूप भाग्यकारक ठरेल. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. या काळात धार्मिक कार्यात मन रमेल. तीर्थक्षेत्रांना आवर्जून भेट द्याल. घरातील सदस्यांबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल.

Leave a Comment