जेव्हा -जेव्हा जगप्रसिद्ध भविष्यवेत्त्यांची चर्चा होते. त्यामध्ये बाबा वेंगा यांचं नाव आघाडीवर असतं, बाबा वेंगा यांचा जन्म बल्गेरियामध्ये 1911 साली झाला होता. तर मृत्यू 1996 साली झाला. त्यांनी आपल्या हयातीमध्ये अनेक मोठे भाकीतं केली, त्यातील काही भाकीतं खरी ठरल्याचा दावा बाबा वेंगा यांच्या समर्थकांकडून करण्यात येतो. बाबा वेंगा यांच्यासंदर्भात असा देखील दावा केला जातो की, एका वादळात सापडल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही डोळ्याची दृष्टी गमावली. त्यानंतर त्यांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली. बाबा वेंगा यांनी आपल्या आयुष्यात अनेक मोठी भाकीत केली आहे. दरम्यान आता त्यांचं आणखी एक मोठं भाकीत समोर आलं आहे.
बाबा वेंगा यांनी तिसऱ्या महायुद्धाबाबत मोठं भाकीत केलं आहे. 2123 मध्ये म्हणजे 98 वर्षांनंतर तिसरं महायुद्ध होईल असं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे. जगभरातील छोटे-छोटे देश एकमेकांसोबत लढतील, यामुळे जगात तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात होईल असं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे. या युद्धात एकही मोठा देश भाग घेणार नाही, असंही बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे. बाबा वेंगा यांनी आपल्या भाकीतामधून असा देखील संकेत दिला आहे की, आणखी 100 वर्षांनी मोठे देश एवढे प्रगत होतील की त्यांना एकमेकांसोबत लढण्याची गरजच राहणार नाही. मात्र जे छोटे देश आहेत, ते आपल्या पेक्षा छोट्या देशांवर सत्ता गाजवण्यासाठी दबाव निर्माण करू शकतात, याच वादातून कदाचित तिसरं महायुद्ध होऊ शकतं असं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे. बाबा वेंगा यांचं हे भाकीत किती खरं होणार? हे आता येणारा काळच सांगू शकतो.
बाबा वेंगा यांनी आपल्या हयातीमध्ये अनेक भाकीतं केली होती, त्यातील काही भाकीतं खरी ठरल्यामुळे अनेकांना बाबा वेंगा यांच्या भाकीतांबाबत उत्सुकता असते. हिटलरचा मृत्यू, इंग्लंडच्या राणीचा मृत्यू, जपमानमध्ये आलेली त्सुनामी, अमेरिकेवर झालेला हल्ला याबाबत बाबा वेंगा यांनी भाकीतं केलं होतं, ते खरं ठरल्याचा दावा केला जातो.