Saturday, September 30, 2023
Homeआरोग्यया गोष्टी खाल्ल्याने हाडे होतील मजबूत!

या गोष्टी खाल्ल्याने हाडे होतील मजबूत!

आपण आपल्या आजूबाजूला अनेकदा पाहिले आहे की वयाची चाळीशी ओलांडलेल्या लोकांची हाडे कमकुवत होऊ लागतात. विशेषत: महिलांच्या शरीरात हे अधिक दिसून येते. जेव्हा हाडे कमकुवत होतात तेव्हा आपल्याला दैनंदिन जीवनातील आवश्यक कामे करण्यास देखील त्रास होऊ शकतो, म्हणून आपण त्याच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आणि त्याची तयारी आत्तापासूनच सुरू करणे महत्वाचे आहे.

वयाच्या चाळीशीनंतरही तुमची हाडे मजबूत राहावीत असे वाटत असेल तर त्यासाठी तुम्हाला कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी सह अनेक पोषक तत्वावर आधारित खाद्यपदार्थ खावे लागतील. हाडांच्या आरोग्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश केला पाहिजेत ते बघूया.

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, ओट्स, खिचडी, संपूर्ण धान्य, फळे, गाजर, वाटाणे, मखाना, अंजीर, कोशिंबीर, शेंगदाणे,अंडी, रताळे, मशरूम, मुळा, पालक याचा समावेश करा. जेवणादरम्यानच कोशिंबीर खा जेणेकरून तुम्हाला भरपूर फायदे मिळतील.

दिवसातून 2 वेळा दूध प्या कारण ते कॅल्शियमयुक्त सुपरफूड आहे.यासह, आपण कमी चरबीयुक्त पदार्थ देखील खाऊ शकता.जर तुम्हाला दूध आवडत नसेल तर डाळ नियमित खा.

अंडी आणि इतर मांसाहारी पदार्थ खाल्ल्याने हाडांना फायदा होईल.दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. हवं तर फळांचा रसही पिऊ शकता.दररोज किमान अर्धा तास चालणे किंवा हेवी वर्कआउट करणे.

RELATED ARTICLES

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

क्राइम

मनोरंजन