3 जुलै सोमवार गुरुपौर्णिमेपर्यंत करा ही सेवा मनातील सर्व इच्छा होतील पूर्ण!

मित्रांनो, प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये मेहनत घेतच असतो जेणेकरुन आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात. परंतु भरपूर कष्ट मेहनत घेऊन देखील आलेला पैसा हा अपुरा पडत जातो आणि त्यामुळे मग घरांमध्ये अशांततेचे वातावरण निर्माण होते. तसेच मित्रांनो प्रत्येकाच्या मनी काही ना काही इच्छा ही असते आणि ती पूर्ण व्हावी यासाठी प्रत्येक जण हा कष्ट मेहनत घेत असतो. काही उपाय करत असतो.

तसेच व्रत उपवास हे देखील करीत असतात. परंतु काही केल्याने जर आपल्या मनातील इच्छा पूर्ण होत नाहीत तर तुम्ही हा उपाय अवश्य करा. हा उपाय तुम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत म्हणजे तीन जुलै सोमवार पर्यंत करायचा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही स्वामी महाराजांना गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवून तुम्ही ही सेवा तेथेच बंद करायची आहे.

ही सेवा तुम्ही गुरुपौर्णिमेच्या अगोदर आठ दिवस, पंधरा दिवस किंवा तुम्ही उद्या, परवा देखील चालू करू शकता. परंतु तीन जुलै सोमवार गुरुपौर्णिमेपर्यंत ही सेवा तुम्हाला चालू ठेवायची आहे. दररोज नित्यनियमाने तुम्ही ही सेवा करायचे आहे. ही स्वामींची सेवा आहे. यामुळे स्वामी महाराज आपणावर प्रसन्न होतील आणि आपल्या मनातील इच्छा सर्व काही पूर्ण करतील आणि स्वामी महाराज आपणाला त्यांचा कृपा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी ठेवतील.

तर सेवा नेमकी कोणती आहे आता जाणून घेऊयात. तर मित्रांनो ही सेवा करत असताना तुम्ही कोणतीही एक वेळ ठरवायचे आहे. म्हणजेच मित्रांनो तुम्ही सकाळ किंवा संध्याकाळ कोणती एक वेळ ठरवायचे आहे आणि तुम्हाला आपल्या देवघरासमोर बसायचे आहे. म्हणजे ज्या दिवसापासून तुम्ही सेवा सुरू करणार असाल त्या पहिल्या दिवशी तुम्हाला देवघरासमोर बसायचे आहे. एक ताम्हण आणि एका तांब्याच्या भांड्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचे आहे.

नंतर तुम्हाला त्यातील थोडेसे पाणी आपल्या हातामध्ये म्हणजेच उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि हातामध्ये पाणी घेतल्यानंतर तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती स्वामींना बोलून दाखवायचे आहे आणि नंतर हे पाणी तुम्हाला ताम्हणात सोडायचे आहे. मित्रांनो हा संकल्प तुम्हाला पहिल्या दिवशी करायचा आहे. मित्रांनो हा संकल्प करण्या अगोदर तुम्हाला देवघरांमध्ये दिवा अगरबत्ती लावायची आहे आणि हा संकल्प करून झाल्यानंतर ओम गुरुभ्यो नमः या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे आणि नंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे.

तुम्हाला जे काही ताम्हणातील पाणी आहे हे पाणी तुम्हाला तुळशीला घालायचे आहे आणि नंतर दुसऱ्या दिवशी पासून तुम्ही संकल्प करायचा नाही . म्हणजेच तुम्ही फक्त पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे. दुसऱ्या दिवशी पासून फकत मंत्र जप करायचा आहे. या मंत्राचा जप तुम्हाला दररोज म्हणजेच गुरुपौर्णिमेपर्यंत दररोज करायचा आहे.

म्हणजेच एक कोणतीही वेळ निश्चित ठरवायची आहे पहिल्या दिवशी जर तुम्ही संध्याकाळी सात वाजता ही जर स्वामींची सेवा केला करत असाल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी देखील संध्याकाळी सात वाजता ही सेवा करायची आहे. फक्त संकल्प तुम्ही पहिल्या दिवशी करायचा आहे. दुसऱ्या दिवशी फक्त दोन मंत्रांचा जप करायचा आहे. एक म्हणजे ओम गुरुभ्यो नमः आणि दुसरा म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा एक एक माळ जप करायचा आहे.

तर मित्रांनो अशा पद्धतीने गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही ही स्वामींची सेवा आवश्य करा आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही स्वामींना काहीतरी गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा आहे. मित्रांनो अशी ही सेवा तुम्ही जर केली तर यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील. स्वामी महाराज तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील.

Leave a Comment