मुलांचे अभ्यासात मन लागत नाही? मग करा ‘हे’ उपाय

वास्तू शास्त्रामध्ये घरातील प्रत्येक दिशेपासून ते वस्तूंपासून अनेक गोष्टींचे महत्त्व आणि शुभ-अशुभ परिणाम सांगितले जातात. या गोष्टींचा अवलंब केल्यास व्यक्तीला सफलता, सुख, शांती, आरोग्य प्राप्त करता येते.

मुलांच्या अभ्यासाबाबतही पालकांच्या अनेक तक्रारी असतात. यासाठी देखील वास्तू शास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत.

वास्तू शास्त्रानुसार, मुलांच्या अभ्यासाठी योग्य दिशेचा वापर करणं गरजेचं आहे. अभ्यास करताना मुलांचा चेहरा नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा. मुलांच्या अभ्यासाची पुस्तकं, वह्या देखील उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावी. परंतु जागेच्या कमतरतेमुळे शक्य नसल्यास ही पश्चिम किंवा नैऋत्य दिशेला ठेवेवी.

वास्तू शास्त्रात पूर्व आणि उत्तर दिशेला शुभ दिशा मानले जाते. कारण या दिशेकडे नेहमी सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह असतो. रात्री झोपताना मुलांचे डोकं नेहमी पूर्व दिशेला असावं, यामुळे मुलांची स्मरण शक्ती उत्तम राहते.
मुलांच्या खोलीची तसेच अभ्यासाची साफ-सफाई करावी. तसेच पुस्तकं, वह्या देखील नीट ठेवावी.

मुलांच्या टेबलाच्या आसपास घरातील शौचालय नसावे.
मुलांच्या अभ्यासाच्या टेबलवर सरस्वती यंत्र ठेवावे.
मुलांना प्रत्येक परिक्षेत यश मिळवण्यासाठी दररोज श्री गणेश अथर्वशीर्षाचे पठण करण्यास लावावे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment