मित्रांनो प्रत्येकालाच आपल्या जीवनामध्ये काही ना काही अडीअडचणी, संकटे हे येतच असतात. त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये अनेक प्रकारच्या इच्छा देखील असतात आणि या इच्छा पूर्ण व्हाव्यात असे देखील आपल्याला मनोमन वाटत असते. परंतु काही वेळेस आपल्या इच्छा या अपूर्ण राहतात. तसेच घरांमध्ये अनेक प्रकारच्या अडीअडचणी, संकटे देखील येत असतात व त्यावेळेस आपण अनेक प्रकारचे शास्त्रामध्ये दिले गेलेले उपाय, व्रत उपवास हे करीतच असतो. तरी देखील काहीच फरक पडत नाही.
आपल्या इच्छा अपूर्ण राहतात. अनेक प्रकारच्या अडचणी आपल्या जीवनामध्ये येत राहतात. तर आज मी तुम्हाला स्वामींची तीन महिन्यांची सेवा सांगणार आहे ही जर सेवा तुम्ही केली तर यामुळे तुम्ही जे जीवन बदलेल. सर्व सुखे तुम्हाला उपभोक्ता येतील. ही तीन महिन्याची सेवा अगदी मनोभावे तुम्ही करायची आहे आणि ही सेवा तुम्ही कोणत्याही दिवसांपासून करू शकता.
जर तुम्ही अगोदर कोणतीही जर सेवा करत असाल तर ती सेवा पूर्ण झाल्यानंतरच ही तीन महिन्यांची स्वामींची सेवा चालू करायची आहे. म्हणजेच तुम्ही जर गुरुचरित्र पारायण, स्वामी चरित्र पारायण करीत असाल तर ते पारायण पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला तीन महिन्यांची स्वामींची सेवा करायची आहे.
तर तुम्ही कोणत्याही दिवसांपासून ही सेवा चालू करायची आहे आणि तीन महिने पूर्ण करायचे आहे. म्हणजे तुम्हाला 90 दिवस ही सेवा करायची आहे. जर काही अडचणी वगैरे आल्या तर तो दिवस सोडून तुम्ही इतर दिवसांपासून मोजायचे आहे. परंतु मित्रांनो तीन महिने पूर्ण ही सेवा करायची आहे. तर ही सेवा करत असताना आपणाला पहिल्यांदा सकाळी लवकर उठायचे आहे आणि सूर्याला अर्घ्य अर्पण करायचे आहे आणि यानंतर तुम्ही आपल्या देवघरांमध्ये जाऊन स्वामींच्या समोर बसून स्वामींची मनोभावे अष्टगंध, फुले, अक्षता वाहून पूजा करायचे आहे. नंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप एक माळ करायचा आहे.
संध्याकाळी नंतर स्वामींची तुम्हाला पूजा करायची आहे. तेव्हा अगरबत्ती लावायची आहे आणि स्वामींचा मंत्र जप हा करायचा आहे. नंतर स्वामींचे श्री सूक्त एक वेळेस वाचायचे आहे. नंतर एक वेळेस तुम्हाला स्वामींच्या नित्यसेवा या पोथीतील रामरक्षा एक वेळेस वाचायचे आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ही पूजा तीन महिने सलग करायची आहे. यामुळे मित्रांनो स्वामी समर्थांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो.
आपल्या जीवनातील सर्व अडीअडचणी दूर होतात. तसेच आपल्या ज्या काही इच्छा अपूर्ण राहिलेले आहेत या इच्छा देखील स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतात. तर अशी ही तीन महिन्यांची स्वामींची सेवा तुम्ही देखील कोणत्याही दिवसांपासून चालू करा. परंतु चालू केल्यानंतर तीन महिने सलग तुम्हाला ही सेवा करायची आहे. यामुळे तुमचे जीवन नक्कीच बदलून जाईल.