योगिनी एकादशीचे व्रत उद्या 14 जून, बुधवारी आहे. यावर्षी योगिनी एकादशीच्या दिवशी दोन अतिशय शुभ योग तयार होत आहेत. योगिनी एकादशीला सूर्योदयाच्या वेळी कुंडलीत गजेकसरी आणि बुधादित्य राजयोग तयार होत आहेत.
गजेकसरी आणि बुधादित्य राजयोगात व्रत आणि उपासना करण्याचा संकल्प करणे शुभ आहे. यामध्ये केलेल्या उपवासाचे दुप्पट पुण्य मिळते. भगवान विष्णूच्या कृपेने घरात सुख, शांती, समृद्धी येते आणि मोक्षही प्राप्त होतो.
हे व्रत तिन्ही लोकांमध्ये फलदायी आहे, असे मानले जाते. पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी योगिनी एकादशी व्रत हा सर्वोत्तम उपाय मानला जातो. जाणून घेऊया योगिनी एकादशीला भगवान विष्णूच्या कोणत्या रूपाची पूजा करावी? योगिनी एकादशी व्रताचा नियम काय?
हिंदू कॅलेंडरनुसार, ज्येष्ठ कृष्ण एकादशी 13 जून रोजी सकाळी 09:28 ते दुसऱ्या दिवशी 14 जून रोजी सकाळी 08:48 पर्यंत आहे. योगिनी एकादशी तिथी दोन्ही दिवशी पहाटे आहे, पण उदयतिथी महत्त्वाची असते. त्यानुसार बुधवार, 14 जून रोजी आषाढ कृष्ण एकादशीची उदयतिथी प्राप्त होत आहे. एकादशी त्या दिवशी सकाळी 08:48 पर्यंत आहे, परंतु योगिनी एकादशीचे व्रत 14 जूनलाच ठेवणे योग्य ठरेल. 13 जून रोजी सूर्योदयानंतर योगिनी एकादशीची तिथी सुरू होते.
स्कंद पुराणात सांगितले आहे की, ज्येष्ठ महिन्यात भगवान विष्णूच्या वामन अवताराची पूजा करणे सर्वोत्तम आहे. कारण वामनदेव हे या महिन्याचे प्रमुख देवता आहेत. यासाठी कृष्ण पक्ष आणि ज्येष्ठ शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी वामन अवताराची पूजा करावी. ज्येष्ठ कृष्ण एकादशीला योगिनी एकादशीचे व्रत केले जाते.
योगिनी एकादशीला वामन अवताराची पूजा करून लाभ घ्या.
वामन पुराणानुसार, जो कोणी ज्येष्ठ महिन्यात वामन अवताराची पूजा करतो त्याच्या मनोकामना पूर्ण होतात. याशिवाय अपत्यहीन जोडप्यांना संततीचे सुख मिळते. पाप आणि दुःखापासून मुक्ती मिळते, असे मानले जाते.
व्रताचे नियम – 1. योगिनी एकादशीच्या एक दिवस आधी म्हणजेच ज्येष्ठ कृष्ण दशमी तिथीला एकादशीचे व्रत करून भगवान विष्णूच्या वामन अवमाराची पूजा करण्याचा संकल्प घ्या. 2. उपवासात अन्न पदार्थ खाऊ नका, फळे खाऊ शकता.
दशमीपासून एकादशी व्रत पूर्ण होईपर्यंत ब्रह्मचर्य पाळा. 3. योगिनी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून भगवान विष्णू आणि लक्ष्मी नारायण यांच्या रूपाचे ध्यान करा. त्यानंतर पंचामृत, तुळशीची पाने आणि इतर पूजा साहित्याने पूजा करावी. 4. पूजेनंतर गरिबांना अन्न, धान्य, वस्त्र, पाणी इत्यादी दान करा.
या महिन्यात खूप उकाडा असतो, त्यामुळे तहानलेल्यांना पाणी जरूर द्यावे. 5. रात्री विष्णूसाठी देव्हाऱ्यात तुपाचा दिवा लावा. रात्रभर जागर करावा. दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर पूजा करू उपवास सोडावा.