ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहाचा राजा हा सूर्य देव मानला जातो. ग्रहांच्या परिवर्तानामुळे अनेक राशींवर त्याचा विशिष्ट परिणाम होतो. सूर्य देवाला यश, आत्मविश्वास व आरोग्याचा कारक मानले जाते.
१५ जूननंतर सूर्य हा मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. वृषभ राशीतून सूर्य व शुक्र या बाहेर पडल्यानंतर मिथुन राशीत प्रवेश करेल. मिथुन राशीमध्ये सूर्याच्या प्रवेशाने 12 राशींवर परिणाम करेल. मिथुन राशीतील सूर्याचे संक्रमण 4 राशीच्या लोकांचे नशीबवान ठरणार आहे. चला जाणून घेऊया सूर्य संक्रमणामुळे कोणत्या राशींना फायदा होईल.
मेष राशी
सूर्याचे संक्रमण मेष राशीच्या लोकांना खूप शुभ परिणाम देईल. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. धनलाभ होईल. धैर्य व पराक्रम वाढेल, ज्यामुळे तुमची सर्व कामे पूर्ण होतील. समाजात आदर वाढेल. नेतृत्व क्षमता चांगली राहील. गुंतवणुकीतून फायदा होईल. भावंडांशी सुसंवाद ठेवा.
सिंह राशी
सिंह राशीच्या लोकांचा स्वामी सूर्य आहे त्यामुळे याचे संक्रमण सिंह राशीच्या लोकांना देखील अनुकूल परिणाम देईल. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरीत बदल होईल. समाजात मान-सन्मान वाढेल. उच्च पदावरील लोकांशी संबंध निर्माण होतील. परदेश दौऱ्यावर जाऊ शकता. वडिलोपार्जित मालमत्ता मिळू शकते.
कन्या राशी
कन्या राशीच्या लोकांना खूप फायदा होईल. कोणत्याही कामात यश मिळेल. परदेशात जाण्याचे किंवा परदेशात स्थायिक होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. व्यावसायिक जीवन चांगले होईल. तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळतील, ज्यामुळे तुम्हाला पुढे जाण्याची संधी मिळेल. आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळेल.
कुंभ राशी
या लोकांना अनेक नव्या क्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळेल. हा काळ तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी देईल, पदोन्नती-पगारवाढीचा योग निर्माण करेल. तुम्ही एखाद्या प्रकल्पात किंवा व्यवसायात नवीन कल्पनांचा समावेश कराल त्यामुळे फायदा होईल.