विनायक चतुर्थीच्या दिवशी ‘या’ मंत्रांचा जप केल्यास घरात नांदेल सुख शांती….

हिंदू धर्मात चतुर्थिच्या दिवसाला खूप महत्त्वाचे मानले जाते. हिंदू धर्मामध्ये चतुर्थिच्या तिथीला गणपती म्हणजेच विघ्नहर्ताची पूजा केली जाते. चतुर्थिच्या दिवशी गणपतीची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. तुमच्या महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे येत असतील तर चतुर्थिच्या दिवशी उपवास आणि गणपतीची पूजा केल्यामुळे तुमच्या कामांमधील अडथळे कमी होण्यास मदत होते. प्रत्येक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी ही तिथी विनायक चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. चतुर्थिच्या दिवशी गणपतीचे व्रत आणि विशेष पूजा केली जाते. मान्यतेनुसार, चतुर्थिच्या दिवशी गणपतीची पूजा केल्यामुळे धन, समृद्धी आणि सौभाग्य वाढते आणि सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते

 

धार्मिक मान्यतेनुसार, चतुर्थिच्या दिवशी गणपतीची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील नकारात्मक उर्जा कमी होते आणि कामांमधील अडथळे कमी होण्यास मदत होते. त्यासोबतच तुमच्या आयुष्यातील वाईट कर्म दूर होतात. या दिवशी गणपतीची पूजा आणि मंत्र जप केला जातो. मान्यतेनुसार, या दिवशी गणपतीची पूजा आणि आरती केल्यामुळे घरातील नकारात्मक उर्जा निघून घरातील वातावरण सकारात्मक होण्यास मदत होते आणि घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते.

 

वैदिक कॅलेंडरनुसार, फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 2 मार्च रोजी रात्री 9:01 वाजता सुरू होत आहे. तर 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:02 वाजता संपेल. अशा परिस्थितीत, उदयतिथीनुसार, विनायक चतुर्थी व्रत 3 मार्च रोजी पाळले जाईल. या दिवशी रात्री 10:11 वाजता चंद्र मावळेल. विनायक चतुर्थिच्या दिवशी “वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥” या मंत्राचा जप केला जातो. हा गणपतीचा सर्वात सोपा मंत्र आहे. हा मंत्र खूप प्रभावी मानला जातो. असे मानले जाते की जो कोणी विनायक चतुर्थीच्या दिवशी योग्य विधी आणि खऱ्या मनाने भगवान गणेशाच्या या मंत्राचा जप करतो, त्याच्या जीवनातील सर्व अडथळे आणि समस्या दूर होतात. घरात नेहमीच सुख आणि समृद्धी राहते. विनायक चतुर्थीच्या दिवशी या मंत्राचा 108 वेळा जप करावा.

 

तुम्ही विनायक चतुर्थिला “ऊँ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्॥” या मंत्राचा जप देखील करू शकता यामुळे तुम्हाला भौतिक लाभ मिळतो. त्याच वेळी, आध्यात्मिक प्रगती होते. या मंत्राचा जप 108 वेळा करावा. तसेच “ॐ नमो सिद्धि विनायकाय सर्व कार्य कर्त्रे सर्व विघ्न प्रशमनाय, सर्व राज्य वश्यकरणाय सर्वजन सर्वस्त्री पुरुष आकर्षणाय श्रीं ॐ स्वाहा ॥” हा गणपतीचा सिद्धिविनायक मंत्र आहे. गणेशाला सिद्धी वियनक असेही म्हणतात. सिद्धी देवी ही गणेशाची पत्नी आहे. जो कोणी विनायक चतुर्थीच्या दिवशी या मंत्राचा जप करतो, त्याच्या घरात सुख-समृद्धी येते आणि त्याला जीवनात यश मिळते.

Leave a Comment