मेष : वैवाहिक जीवन सुखाचे
दिनांक २ रोजीचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवसांचा कालावधी चांगला राहील. चांगल्या कालावधीमध्ये चांगल्या कामाचा श्रीगणेशा होईल. वारंवार होणारा त्रास कमी होईल. प्रत्येक वेळी होणारी द्विधा मनोवस्था सध्या होणार नाही. ठामपणे निर्णय घ्याल आणि ते यशस्वी होतील. इतरांना तुमच्या मदतीची गरज भासेल. व्यवसायातील आवक-जावक वाढेल. नोकरदार वर्गाला कामासंदर्भात येणारा ताण जाणवणार नाही. आर्थिक बाजू भक्कम होईल. सामूहिक ठिकाणी मनोरंजनासाठी सहभाग राहील. शेजाऱ्यांशी जेवढ्यास तेवढे राहिलेले चांगले. कार्यक्रमानिमित्त नातेवाईकांशी भेटीगाठी होतील. मात्र भेटीगाठी होताना जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. वैवाहिक जीवन सुखाचे राहील. धार्मिक गोष्टींसाठी वेळ द्यावा लागेल.
योगसाधनेला महत्त्व द्या.
शुभ दिनांक : ३, ४
महिलांसाठी : कामे वेळेत पूर्ण होतील.
वृषभ : योग्य व्यवस्थापन करा
दिनांक ३, ४ हे दोन दिवस शांततेत पार पाडा. कारण नेमके याच दिवसांत अशा काही गोष्टी घडतात, ज्या आपल्या मनाविरुद्ध असतात आणि तिथे आपण स्पष्ट प्रतिक्रिया देत असतो. अशा वेळी फक्त वातावरण बिघडून जाते. याचा त्रास समोरच्यालाही आणि तुम्हालाही होतो. कामे वेळेत पूर्ण होत नाहीत. मग तुमची चिडचिड होते. तेव्हा प्रत्येक गोष्टीचे व्यवस्थापन नीटपणे करा. म्हणजे त्रास होणार नाही. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल.
व्यवसायात धावपळ होईल. मात्र फायद्याचे प्रमाण चांगले राहील. नोकरदार वर्गाला कामात पूर्णपणे लक्ष देता येईल. खर्च सांभाळून करा. राजकीय क्षेत्रात हस्तक्षेप टाळा. घरगुती वातावरण ठीक राहील. जोडीदाराची साथ मिळेल. उपासना फलद्रूप होईल.
आरोग्याकडे लक्ष द्या.
शुभ दिनांक : २, ६
महिलांसाठी : शब्द जपून वापरा.
मिथुन : नियमांचे पालन करा
दिनांक ५, ६ हे संपूर्ण दोन दिवस, ७ तारखेला दुपारपर्यंत असा हा अडीच दिवसांचा कालावधी जेमतेम राहील. नेमक्या याच दिवसांत बदल होत राहतात याचा अनुभव येईल. काय करावे काय करू नये हेही सूचणार नाही. इतरांचा सल्ला घ्या, त्यांना प्रतिउत्तर करू नका. तुम्हाला जे योग्य वाटेल तेच करा. स्वत:ला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. नियमांचे पालन करा. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायात नवनवीन गोष्टींची सुरुवात करण्यासाठी जे नियोजन आखलेले होते, चढ-उतार होऊ शकतो. नोकरदार वर्गाचे कामकाज सुरळीत चालेल. आर्थिक बचत करणे योग्य राहील. समाजमाध्यमांचा वापर करताना भान ठेवा. मित्र-मैत्रिणींशी संवाद साधताना जरा जपून. कौटुंबिक वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्या. धार्मिक गोष्टींची आवड राहील. प्रकृतिस्वास्थ्य जपा.
शुभ दिनांक : ४, ८
महिलांसाठी : स्वत:चे काम स्वत: करा.
कर्क : सुवर्णसंधी मिळेल
७ तारखेला दुपारनंतर आणि ८ तारखेचा संपूर्ण दिवस असा हा दीड दिवसाचा कालावधी फारसा अनुकूल नाही, त्यामुळे या कालावधीत शुभ गोष्टींची सुरुवात करू नका. बाकी दिवस चांगले असतील. चांगले दिवस असल्याने शुभ गोष्टींची सुरुवात करायला हरकत नाही. काही वेळेला इच्छा नसतानाही परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात आणि हे निर्णय तुमच्या मनाविरोधात असतात. सध्या मात्र तसे होणार नाही. तुमच्या मनानुसार सर्व गोष्टी घडणार आहेत. तुम्हाला एक सुवर्णसंधी मिळणार आहे. या संधीचा उपयोग करून घ्या. व्यवसायात लाभ होईल. नोकरदार वर्गाला जबाबदारीतून मुक्तता मिळेल. आर्थिक ताणतणाव कमी होईल. राजकीय क्षेत्रात वर्चस्व वाढेल. घरगुती वातावरण आनंदी राहील. मानसिक समाधान लाभेल.
प्रकृती चांगली राहील.
शुभ दिनांक : २, ५
महिलांसाठी : सकारात्मक गोष्टी घडतील.
सिंह : यशस्वी वाटचाल
दिनांक २ रोजीचा एकच दिवस अनुकूल नाही. बाकी दिवसांत चंद्रग्रहाचे भ्रमण भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे होत आहे. या चांगल्या दिवसांमध्ये बऱ्याच काही गोष्टी साध्य होणार आहेत. आजपर्यंत ज्या गोष्टीची तुम्ही वाट पाहत होता ती गोष्ट आता पूर्ण होणार आहे. सध्या आपल्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींत लक्ष जाणार नाही. पोषक वातावरण राहील. व्यवसायात खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होतील, त्यातून फायद्याचे प्रमाण चांगले राहील. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक बाबतीत अनपेक्षितपणे लाभ होईल. समाजसेवेची आवड राहील. एकूणच वाटचाल यशस्वी राहील. घरामध्ये ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रकृतीत सुधारणा होईल.
धार्मिक कार्यात सहभाग राहील. प्रकृती उत्तम राहील.
शुभ दिनांक : ३, ८
कन्या : आरोग्य जपा
दिनांक ३, ४ हे दोन दिवस, ५ तारखेला दुपारपर्यंत असे अडीच दिवस बेताचे राहतील. या दिवसांत धाडसी निर्णय घेऊ नका. तुम्हाला धाडस करायचेच असेल तर दिवस चांगले असतील अशा दिवशी करा. म्हणजे नुकसान होणार नाही. प्रत्येक कामाचे नियोजन करा, म्हणजे तुमचे काम फसणार नाही. अनोळखी व्यक्तींपासून लांब राहा. कोणतेही व्यवहार करताना सतर्क राहा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायातून ग्राहकांचा मिळणारा प्रतिसाद चांगला असेल. नोकरदार वर्गाच्या कामकाजात पारदर्शकता येईल. आर्थिक उधारी टाळा. राजकीय क्षेत्रात वरिष्ठांकडून येणाऱ्या नियमांचे पालन करा. कुटुंबामध्ये चर्चा करा, पण टोक गाठू नका. जोडीदाराचे मत विचारात घ्या.
मानसिक ताणतणाव घेऊ नका. आरोग्य जपा.
शुभ दिनांक : ६, ७
महिलांसाठी : कोणतेही काम करताना आराखडा तयार करा.
तूळ : वादविवाद टाळा
षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. असे भ्रमण म्हणजे तारेवरची कसरत असते. अशा वेळी आपण संयम सोडून चालणार नाही. कोणतेही काम करताना विचारपूर्वक करा. आपले काम दुसऱ्यावर सोपवून चालणार नाही. आपले काम आपल्यालाच करावे लागेल. इतरांच्या वैयक्तिक गोष्टींत हस्तक्षेप करू नका. त्याचा त्रास होऊ शकतो. जिथे बोलल्याशिवाय पर्याय नाही अशा ठिकाणी मात्र तीव्र प्रतिक्रिया देऊ नका. वादविवाद टाळा. व्यवसायात भागीदारी सध्या तरी नको.
नोकरदार वर्गाचे काम व्हावे असे वाटत असेल तर इतर गोष्टीकडे लक्ष देऊ नका. आर्थिक व्यवहार जपून करा. समाजमाध्यमांचा वापर जेवढ्यास तेवढा करा. घरगुती वातावरण चांगले कसे राहील ते पाहा.
आध्यात्मिक गोष्टींत गुंतून राहा.
प्रकृतीची काळजी घ्या.
शुभ दिनांक : ३, ४
महिलांसाठी : स्वत:चे निर्णय स्वत: घ्या.
वृश्चिक : मानसिक ताण नको
दिनांक ३, ४, ७, ८ असे हे चार दिवस शांततेत पार पाडा. कोणाचेही दुखणे घेऊन त्यावर चर्चा करत बसू नका. तुम्हाला एक सवय लागून गेली आहे, ती म्हणजे स्वत:चा त्रास कमी, पण इतरांवर चर्चा करून त्रास करून घ्यायचा आणि त्रास कसा झाला म्हणून विचार करत बसायचे. स्वत:च्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींत लक्ष घालू नका. आपले काम भले नि आपण भले हेच फायद्याचे राहील. कोणालाही सल्ला देणे टाळा. काम वेळेत कसे पूर्ण होईल याचा विचार करा. सहनशीलता वाढवा. बाकी दिवस ठीक राहतील. व्यवसायात गुंतवणूक टाळा. नोकरदार वर्गाने वरिष्ठांच्या सहकार्याची सध्या तरी अपेक्षा ठेवू नका. आर्थिक बाबतीत उधारी करणे टाळा.
कुटुंबाची काळजी घ्या. मानसिक ताण घेऊ नका.
प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका.
शुभ दिनांक : २, ६
महिलांसाठी : आपले मत इतरांवर लादू नका.
धनू : अनावश्यक खर्च टाळा
दिनांक ५, ६ आणि ७ असे तीन दिवस शुभ कसे जातील याचा प्रयत्न करा. कारण या दिवसांत नको तो व्याप मागे लागू शकतो, त्यामुळे तुमची चिडचिड होईल. शिवाय गोष्ट छोटी असो किंवा मोठी असो मात्र राईचा पर्वत करता आणि त्रास वाढवून घेता. एखादी गोष्ट नाही पटली तर सोडून द्यायला शिका. यातच तुमचे भले असेल. प्रत्येक गोष्टीत सोक्षमोक्ष लावत बसलात तर सर्वात जास्त त्रास तुम्हाला होऊ शकतो. इतरांना काय वाटेल, काय वाटणार नाही याचा तुम्ही विचार करत नाही. तुम्हाला जे पटते तेच पुढे रेटून न्यायचे अशी तुमची मानसिकता राहते. तेव्हा यामध्ये बदल करा, म्हणजे त्रास होणार नाही. बाकी दिवस ठीक राहतील. व्यवसायात सध्या आवक कमी राहील. नोकरदार वर्गाला वेळेत काम करावे लागेल. अनावश्यक खर्च टाळा. मित्र-मैत्रिणींशी संवाद साधाल. कौटुंबिक वादविवाद टाळा.
प्रकृतीची काळजी घ्या.
शुभ दिनांक : ३, ४
महिलांसाठी : आपलेच खरे करण्यात अर्थ नाही हे लक्षात ठेवा.
मकर : नियोजनाला महत्त्व द्या
दिनांक ७, ८ हे दोन दिवस अनुकूल नाहीत. तेव्हा महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला. जिथे वादविवादाचा प्रसंग येणार आहे अशा ठिकाणी संयम ठेवा. म्हणजे पुढची परिस्थिती आटोक्यात राहील. नाही तर स्पष्ट बोलल्यामुळे सुरळीत चाललेली घडी विस्कळीत होईल. कोणतेही काम करताना वेळेचे भान ठेवा. नियोजनानुसार काम केल्यास त्रास होणार नाही. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायात बदल कराल. नोकरदार वर्गाला कामानिमित्त प्रवास करावा लागेल. आर्थिक बचत करणे योग्य राहील. राजकीय क्षेत्रात कामामध्ये अचानक बदल होतील. मित्रपरिवाराची मदत मिळेल. मुलांचे लाड करा, पण शिस्त बिघडू देऊ नका. घरामध्ये सर्वांच्या संगनमताने कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवा. प्रकृती ठीक राहील.
शुभ दिनांक : ५, ६
महिलांसाठी : इतरांचे मत जाणून घ्या.
कुंभ : सकारात्मक परिवर्तन
सध्या सप्ताहात असा कोणताच दिवस नाही की त्या दिवसात त्रास होणार आहे. सर्व दिवस चांगले असतील. त्यामुळे तुम्हालाही एक प्रकारचा उत्साह राहणार आहे. काय करावे काय करू नये यासाठी जास्त डोके चालवावे लागणार नाही. परिस्थितीच अशी निर्माण होईल की समोरून येणारे प्रस्ताव चांगले असतील. ज्या वेळी काम करण्याची मानसिकता असते त्या वेळी समोरून प्रतिसाद मिळत नाही. सध्या मात्र हा प्रतिसाद मिळणार आहे, त्यामुळे काम वेळेत पूर्ण होईल. व्यवसायात फायद्याचे प्रमाण चांगले राहील. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. सामाजिक माध्यमांद्वारे प्रसिद्धी मिळेल. घरगुती वातावरण आनंदी असेल. सकारात्मक परिवर्तन घडेल.
मानसिक समाधान लाभेल. प्रकृती उत्तम राहील.
शुभ दिनांक : ७, ८
महिलांसाठी : स्वत:चे अस्तित्व निर्माण होईल.
मीन : व्यक्तिमत्त्व खुलेल
शुभ ग्रहांची साथ उत्तम राहील. सर्व दिवस चांगले असतील. चांगल्या दिवसांमध्ये महत्त्वाच्या कामाला सुरुवात होईल. अडथळ्यांचे प्रमाण कमी होईल. मनामध्ये सतत येणारे नकारात्मक विचार कमी होतील. आतापर्यंत चांगल्या कामासाठी उशीर होत होता तो आता होणार नाही. जो मार्ग मिळेल तो चांगलाच असेल. व्यवसायात मोठी गुंतवणूक करायला हरकत नाही. त्यातून चांगला फायदा होईल. नोकरदार वर्गाने वेळेत काम न केल्यास वरिष्ठांचे बोलणे खावे लागेल. आर्थिक लाभ होईल. राजकीय क्षेत्रात चर्चा करताना वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या. कुटुंबाला वेळ देत असताना वरिष्ठांच्या प्रकृतीची विचारपूस करा. भावंडांच्या भेटीगाठी होतील. धार्मिक गोष्टींची आवड राहील. मानसिक समाधान लाभेल. व्यक्तिमत्त्व खुलेल.
आरोग्य उत्तम राहील.
शुभ दिनांक : २, ३
महिलांसाठी : संघर्षदायक वातावरण राहणार नाही.