७ जुलैपर्यंत ‘या’ राशींना धनाची कमीच पडणार नाही?

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व ग्रह वेगवेगळ्या वेळेत राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतात. ज्याचा शुभ- अशुभ प्रभाव सर्व राशींच्या कुंडलीमध्ये कमी अधिक प्रमाणात दिसून येऊ शकतो. मे महिन्याच्या शेवटी दैत्य गुरुदेवांनी कर्क राशीत गोचर केले होते. यामुळे कर्कसह काही राशींच्या गोचर कुंडलीत लक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. तब्बल ७ जुलै पर्यंत म्हणजेच पुढील एक महिनाभर हा राजयोग काही राशींसाठी शुभ ठरू शकतो. १२ राशींपैकी ४ राशींना लक्ष्मी राजयोग अत्यंत लाभदायक ठरण्याची चिन्हे आहेत. या राशींना नेमका कसा लाभ होणार हे ही पाहूया…

मेष रास

मेष राशीला लक्ष्मी राजयोग बनल्याने नशिबाची खूप मदत मिळू शकते. प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश लाभण्याची चिन्हे आहेत पण चिकाटीने काम करावे लागेल. तुमच्या वाणीने अनेकांची मने जिंकून घेतुम्हाला भविष्यात खूप मोठी मदत मिळू शकते. गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला लाभदायक काळ आहे. जर लक्ष देऊन व तज्ञचन्ह सल्ला घेऊन तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक केली तर त्यातून येत्या कामात खूप धन लाभण्याची शक्यता आहे. नोकरदार मंडळींना पगारवाढीसाठी आपले काम सिद्ध करावे लागू शकते. वाहन व प्रॉपर्टी खरेदीसाठी शुभ कालावधी आहे.

कर्क रास

कर्क राशीत शुक्र व गुरु विराजमान असल्याने येत्या महिन्याभरात तुमच्या राशीला चारही बाजूंनी लाभाची चिन्हे आहेत. कुटुंबासह सुखाचा काळ अनुभवता येऊ शकतो. एखाद्या नव्या व्यवसायात गुंतवणुक केल्यास फायदा होऊ शकतो. समाजात मान- सन्मान वाढीस लागू शकतो. तुमचे खर्च वाढतील पण बहुतांश खर्च हा तुमच्या सुख सोयी व गरजांसाठी करावा लागेल त्यामुळे कुठेच वायफळ पैसे गमावल्याची भावना बाळगू नये. यामुळेच तुम्हाला मानसिक सुख व समाधान अनुभवता येऊ शकते.

कन्या रास
लक्ष्मी राजयोग बनल्याने कन्या राशीचे नशीब चमकण्याची चिन्हे आहेत. तुम्हाला जोडीदारासह सुखाचा काळ अनुभवण्याची संधी मिळू शकते. दीर्घ काळापासून अडकून पडलेली कामे पूर्णत्वास जाऊ शकतात. यातून तुम्हाला धनलाभाचे सुद्धा चिन्हे आहेत. तुमच्या आई- वडिलांच्या गुंतवणुकीतून सुद्धा खूप फायदा होऊ शकतो. स्पर्धा परीक्षा देण्याच्या विचारात असाल तर एक पाऊल पुढे जाण्यासाठी हा योग्य कालावधी ठरू शकतो.

मकर रास
मकर राशीच्या मंडळींची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. कर्जातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला काही प्रमाणात नशीब व मेहनतीचे बळ लाभू शकते. जीवनात येणाऱ्या अनेक अडचणींवर मात करून तुम्ही प्रगतीपथावर पुढे जाऊ शकता. गुरूच्या आशीर्वादाने तुम्हाला यश मिळवून देणारा एखादा मार्गदर्शक लाभू शकतो. येत्या काळात जुन्या मित्रांशी गाठीभेटी होण्याचे योग आहेत.

अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment