पोटाची चरबी कमी करायची आहे तर नक्की करा हा घरगुती उपाय!

वाढते वजन ही आजकाल वयाची समस्या आहे. त्याचबरोबर एकदा पोट आणि कमरेची चरबी वाढली की ती कमी करणे खूप अवघड ठरत आहे, पण आता घाबरून जाण्याची गरज नाही, एखादे विशिष्ट पेय प्यायल्याने तुम्ही वजन वेगाने कमी करू शकता आणि हे पेय तयार करणे देखील खूप सोपे आहे.

पोटाची चरबी कमी करणं इतकं सोपं नसतं, पण घरात असलेल्या जिऱ्याचा वापर केल्यास ही समस्या सहज दूर होऊ शकते. त्याचबरोबर वाढते वजन कमी करण्यासाठी जिऱ्याचे पाणी पिऊ शकता. हे शरीरातील चरबीविरूद्ध प्रभावीपणे कार्य करते.

जिरे हा एक असा मसाला आहे ज्याशिवाय अनेक भारतीय पाककृतींची चव फिकी पडते, ते खाल्ल्याने वजन तर कमी होतेच, शिवाय पचनक्रियाही योग्य होते आणि पोटाचे सर्व विकार दूर होतात. जिरे पिणे फायदेशीर आहे कारण त्यात कॅलरी कमी असतात आणि चरबी कमी करण्यास मदत होते. जिऱ्याच्या पाण्यात लोह खूप जास्त प्रमाणात आढळते आणि शरीरातील जळजळ कमी करण्याची शक्ती देखील यात असते.

जिरे पेय तयार करण्यासाठी २ चमचे जिरे घेऊन एक ग्लास पाण्यात टाकून रात्रभर भिजवून ठेवावे. भिजवताना पाणी उकळून घ्या आणि नंतर थंड झाल्यावर सुती कापडाने गाळून घ्या. शेवटी या पेयात लिंबाचा रस घालून प्यावे. 2-2 आठवडे नियमित हे पेय प्यायल्यास त्याचा परिणाम दिसेल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment