२९ जानेवारी आज लंबोदर संकष्टी चतुर्थीला कुणाला लाभेल बाप्पाची कृपा? मेष ते मीन राशींना कसा होईल लाभ?

आज, २९ जानेवारीला सकाळी ६:१० वाजता लंबोदर संकष्टी चतुर्थी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३० जानेवारीला सकाळी ८:५४ वाजता तिथी समाप्त होईल. यावेळी संकष्टी चतुर्थीचा उपवास २९ जानेवारीला आहे तर चंद्रोदयाची वेळ ९ वाजून १० मिनिटांनी आहे. या दिवशी मेष ते मीन राशीला कसा लाभ होऊ शकतो हे पाहूया..

मेष:-कलासक्त दृष्टीकोन वाढीस लागेल. मैत्रीचे नवीन संबंध जुळून येतील. आवडीचे पदार्थ खाल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. आनंदी दृष्टीकोन बाळगाल.

वृषभ:-दिवस मनाजोगा घालवाल. काही गोष्टी जाणीवपूर्वक लपवाल. तुमची उत्तम छाप पडेल. जि‍भेवर साखर ठेवून बोलाल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.

मिथुन:-मानसिक चंचलता जाणवेल. मैत्रीचे संबंध घट्ट होतील. कामात स्त्रियांची मदत मिळेल. वागण्यात शालीनता दाखवाल. उत्तम व्यावसायिक लाभ होईल.

कर्क:-कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण असेल. गोड बोलून कामे साध्य करता येतील. कलागुण उत्तमरीत्या प्रकट होतील. घराची सजावट कराल. व्यवसायात समाधानकारक वातावरण राहील.

सिंह:-कामात स्थिरता ठेवावी. धार्मिक वृत्तीत वाढ संभवते. इतरांना आनंदाने मदत कराल. पित्तविकार बळावू शकतात. इतरांच्या विश्वासास पात्र व्हाल.

कन्या:-काही कामे कमी श्रमात पार पडतील. अचानक धनलाभ संभवतो. रेस, सोडत यातून लाभ संभवतो. बौद्धिक ताण राहील. आपलेच म्हणणे खरे कराल.

Leave a Comment