मित्रांनो आपण सर्वजण स्वामींचे भक्त असतो.आपण स्वामींची पूजा घरामध्ये असो किंवा मंदिरामध्ये असो आपण श्रद्धेने आणि मनोभावे पूर्ण करतो. स्वामींना प्रसन्न करण्यासाठी आपण जपमाळ किंवा पारायण मंदिरामध्ये जाऊन करत असतो. तर मित्रांनो असे नाही की सर्वांच्या घरांमध्येच स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल काहींच्या घरी मूर्ती आणि फोटो असतो.तर काहींच्या घरी नसली तर स्वामींची मूर्ती घरामध्ये किंवा फोटो नसताना सुद्धा कशी पूजा करावी . हे मी तुम्हाला तर सांगणार आहे. जर तुम्हाला मूर्ती फोटो घेण्याची शक्य होत असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. आता घेणे शक्य नसेल तर थोड्या दिवसांनी घ्या.
तुम्ही एक आपल्या वहीचे पान घ्यावे किंवा कोणत्याही एक पेपर घ्यावा.व त्याच्यावर श्री स्वामी समर्थ हे नाव लिहावे. श्री स्वामी समर्थ हे नाव लिहिताना लाल पेनाचा वापर करावा. त्या पानावर श्री स्वामी समर्थ हे लिहून झाल्यानंतर खालच्या ओळींमध्ये लिहायचे आहे. की भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे. एवढे लिहून ते आपल्या देवघरांमध्ये ठेवावे. आणि त्या नावाचे अष्टगंध लावून फुल टाकून अगरबत्ती लावून पूजा करावे. आणि मित्रांनो आपण त्याच नावाला बघून स्वामींची सेवा करावी.
फोटोमध्ये जेवढी ताकद आहे आणि मूर्तीमध्ये जेवढी ताकत आहे तेवढी श्री स्वामी समर्थ या वाक्यामध्ये ताकद आहे.आणि त्यापेक्षा ताकदीचे वाक्य म्हणजे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींची पूजा करण्यासाठी आपल्याला फोटो किंवा मूर्ती पाहिजे असे काही नाही.जेव्हा आपल्याला मूर्ती आणि फोटो घेणे शक्य होईल तेव्हा आपण ती घ्यावी.पण जर आपल्याला स्वामींची सेवा करायची असेल तर ती एका पानावर आपण हे लिहून सुद्धा आपण सेवा चालू करू शकतो. स्वामींची पुजा श्रध्देने केले तर स्वामी आपल्यालावर नक्की प्रसन्न होतात.