उद्या वसुबारस! गोवत्स द्वादशीला पूजा कशी कराल? जाणून घ्या योग्य मुहूर्त

दिवाळी हा सण आनंदाचा, उत्साहाचा आणि दिव्यांचा सण. या दिवसात आपल्या सर्वत्र रोशनाई पाहायला मिळते. तसेच फटाके, रांगोळी आणि दिव्यांची आरास म्हणून हा सण ओळखला जातो.

या पाच दिवसात सर्वत्र प्रकाश पाहायला मिळतो. तसेच प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व असते. यंदा दिवाळीचा हा सण ९ नोव्हेंबरपासून सुरु होणार असून १५ नोव्हेंबरला त्याची सांगता होईल. दिवाळीची सुरुवात ही वसुबारस सणाने होते. हा सण या वर्षी ९ नोव्हेंबरला साजरा केला जाईल. गोवत्स द्वादशीला पूजा कशी कराल? पूजेचा मुहूर्त काय? जाणून घेऊया याबद्दल..

आश्विन कृष्ण पक्ष एकादशी गुरुवार, ९ नोव्हेंबरला वसुबारसचा सण साजरा केला जाईल. वसुबारसच्या दिवशी रमा एकादशी आणि गोवत्स द्वादशी देखील असणार आहे. या दिवशी गाय-वासराची पूजा केली जाते. गोडाधोडाचा नैवेद्य

वसुबारसच्या दिवशी सायंकाळी गाईची आणि वासराची पूजा केली जाते. लक्ष्मी देवीचे आपल्या घरी आगमन व्हावे यासाठी गाय-वासराची पूजा करतात. गोवत्स द्वादशीचा मुहूर्त हा सायंकाळी ०५.३१ मिनिटे ते ०८.०९ मिनिटांपर्यंत आहे. दाखवला जातो.

वसुबारसच्या दिवशी सायंकाळी गाईची आणि वासराची पूजा केली जाते. लक्ष्मी देवीचे आपल्या घरी आगमन व्हावे यासाठी गाय-वासराची पूजा करतात. गोवत्स द्वादशीचा मुहूर्त हा सायंकाळी ०५.३१ मिनिटे ते ०८.०९ मिनिटांपर्यंत आहे.

या दिवशी दारात रांगोळी काढून दिव्यांची आरास केली जाते. दिवाळीचा पहिला सण आणि पहिला दिवा या दिवशी लावला जातो. गावाकडच्या भागात सुवासिनी स्त्रिया गाय- वासरुची पूजा या दिवशी करतात. गायीच्या पायांवर पाणी घालून हळद-कुंकू आणि अक्षता वाहतात, ओवाळतात. पुरणपोळीचा किंवा गोडाचा नैवेद्य दाखवतात. शहराकडच्या भागात घरोघरी मातीच्या गाय-वासराची पूजा केली जाते. तसेच दिवाळीच्या सणाला सुरुवात होते.

Leave a Comment