‘या’ राशींची दिवाळी होणार शानदार! कमाईत दुपटीने वाढ; २१ दिवस शुभ-लाभ!

मित्रानो, नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध तूळ राशीतून वृश्चिक राशीत विराजमान झाला आहे. २७ नोव्हेंबरपर्यंत बुध वृश्चिक राशीत असेल. त्यानंतर बुध धनु राशीत प्रवेश करणार आहे. विशेष म्हणजे बुध एकाच महिन्यात दोनवेळा राशीपरिवर्तन करणार आहे.

बुध हा शुभ ग्रह मानला गेला असून, ऐन दिवाळीत होणार बुधाचे गोचर काही राशींना अतिशय सकारात्मक मानले जात आहे. ज्योतिषशास्त्रात बुध ग्रह बौद्धिक शक्ती, तार्किक क्षमता आणि आर्थिक लाभ प्रदान करतो. बुधाचे गोचर व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी अत्यंत शुभ परिणाम देणारे मानले जात आहे. सुमारे २१ दिवस बुध वृश्चिक राशीत असेल.

ऐन दिवाळीत कमाई अनेक पटींनी वाढेल. नोकरदारांना लक्ष्मी देवीच्या आशीर्वादाने करिअरमध्ये प्रगतीच्या शुभ संधी मिळतील. दिवाळीनंतर १६ नोव्हेंबरला मंगळ आणि सूर्यही वृश्चिक राशीत येतील. सूर्य आणि बुध यांचा बुधादित्य राजयोग तयार होईल आणि अनेक राशींना आर्थिक लाभ होईल, असे म्हटले जात आहे. तुमच्यासाठी बुधाचे गोचर कसे ठरेल? जाणून घ्या…

मेष: बुधाचे गोचर काहीसे संमिश्र ठरू शकेल. बोलण्यावर ताबा न राहिल्याने नुकसान सहन करावे लागू शकते.व्यवसायात दूरदृष्टीच्या अभावामुळे नुकसान होऊ शकते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करणे योग्य नाही. बोलण्यावर नियंत्रण ठेवूनच कोणतीही समस्या सोडवा. ऑफिसमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद टाळा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि खर्चावर नियंत्रण ठेवा.

वृषभ: बुधाचे गोचर शुभ प्रभाव वाढवणारे मानले जात आहे. दिवाळीच्या या शुभ मुहूर्तावर व्यवसायात चांगली प्रगती दिसेल. मान वाढेल. करिअर आणि नोकरीशी संबंधित चांगली बातमी मिळेल. वैवाहिक संबंध आणि प्रेमसंबंधांसाठीही बुध गोचर शुभ मानले जाते. नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे.

मिथुन: बुधाचे गोचर काहीसे संमिश्र ठरू शकेल. खर्चात मोठी वाढ होऊ शकते. व्यवसायात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण कमी होईल. आवडते काम करण्याची संधी मिळेल. पूर्ण उत्साहाने काम कराल आणि कमाई वाढेल. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो. अन्यथा तुमची सर्व कमाई खर्च होईल.

कर्क: बुधाचे गोचर खूप शुभ प्रभाव देऊ शकेल. व्यवसायात नवीन आणि उत्कृष्ट संधी मिळतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये विशेष यश मिळेल. नोकरीच्या मोठ्या संधी मिळू शकतात. मात्र, आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. पैसे खर्च करताना विचारपूर्वक करावे लागेल.

सिंह: जीवनात शुभ प्रभाव वाढू शकेल. आर्थिक आघाडी मजबूत होऊ शकेल. नवीन घर आणि वाहनावर खर्च करू शकता. नफाही मिळेल. करिअरमध्ये अनेक उत्तम संधी मिळतील. कुटुंबातील सदस्यांकडून सर्व प्रकारची मदत मिळेल. करिअरमध्ये शुभ प्रभाव वाढतील.

कन्या: बुधाचे गोचर शानदार परिणाम देणारे ठरू शकेल. दिवाळीत पैसे कमविण्याच्या अनेक उत्तम संधी मिळतील. एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून पैसे मिळतील. योजना यशस्वी होतील. मित्र आणि कुटुंबीयांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. धनलाभ होईल. माध्यम आणि लेखनाशी निगडित आहेत, त्यांच्या कारकिर्दीत अनेक शुभ परिणाम देईल.

तूळ: शुभ प्रभावामुळे प्रत्येक कामात यश मिळू शकेल. रखडलेल्या योजना पुन्हा सुरू होऊ शकतात. पैशाची बचत करण्यात यश मिळेल. आर्थिक लाभ होईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने व्यवसायात गुंतवणुकीची संधी मिळेल. नफा मिळेल. कामाच्या ठिकाणी स्थिती आणि प्रभाव वाढू शकतो. काही नवीन ऑर्डर मिळू शकते.

वृश्चिक: अनुकूल परिणाम मिळू शकतील. व्यवसायात आर्थिक लाभ होईल. करिअरशी संबंधित काही सुवर्ण संधी मिळू शकतात. रखडलेल्या योजना पुन्हा सुरू होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या आणि निष्काळजीपणा टाळा. नवीन व्यवसायात हात आजमावण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी उत्तम असेल. चांगला नफा मिळेल.

धनु: खूप अनुकूल परिणाम देणारे मानले जाते. कमाईत अचानक वाढ होईल. परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर ही एक उत्तम संधी आहे. ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. हे संक्रमण त्यांच्यासाठी उत्कृष्ट परिणाम देणारे मानले जाते. कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध अधिक सौहार्दपूर्ण बनतील.

मकर: बुध गोचरामुळे मेहनतीचे यथोचित फळ मिळू शकेल. कमाईच्या साधनांमध्ये वाढ होईल. व्यवसाय वाढवण्यासाठी बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. व्यावसायिक जीवनासाठी हे गोचर उत्कृष्ट ठरणार आहे. व्यावसायिकांसाठी बुधचे गोचर देवी लक्ष्मीच्या आशीर्वादापेक्षा कमी नाही.

कुंभ: मान-सन्मान वाढेल. करिअरमध्ये प्रगती करण्याच्या उत्तम संधी मिळतील. व्यवसाय वाढेल. अभ्यास पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या शोधात असलेल्या विद्यार्थ्यांना शुभ परिणाम देईल. कामाच्या ठिकाणी मेहनत केल्यास यश मिळेल. कुटुंबात आईची साथ मिळेल.

मीन: जीवनात शुभफळ आणणारे मानले जाते. इच्छित जीवनसाथी मिळू शकेल. विवाह निश्चित होऊ शकेल. करिअरशी संबंधित प्रत्येक बाबतीत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन कल्पनांवर काम कराल. माता लक्ष्मीची साथ मिळेल.

Leave a Comment