पुढच्या ४८ तासांनंतर शनी मार्गी होणार, ‘या’ राशींचा होणार सुवर्णकाळ सुरू!

ज्योतिषशास्त्रात सर्वाधिक संथ चालीचा ग्रह मानला जाणारा शनी लवकरच आपली चाल बदलणार आहे. शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षे लागतात.

त्यामुळं संपूर्ण राशीचक्र फिरण्यासाठी शनीला सुमारे ३० वर्षे लागतात. या काळात त्याची चाल कधी वक्री तर कधी सरळ असते. सध्या वक्री असलेला शनी ४ नोव्हेंबरपासून पुन्हा मार्गी होणार आहे.

सध्या शनी कुंभ राशीत असून तो वक्री आहे. शनिवार, ४ नोव्हेंबर, २०२३ रोजी शनी पुन्हा मार्गी होईल आणि सरळ चालीनं पुढं सरकू लागेल. शनीच्या या बदलत्या मार्गक्रमणाचा काही राशींना प्रचंड फायदा होणार आहे. शनीच्या शुभ प्रभावामुळे या राशीच्या लोकांचं नशीब उजळू शकतं. कोणत्या राशींना शनीच्या मार्गी होण्याचा लाभ पाहूया…

मेष राशी
शनी मार्गी झाल्यामुळं मेष राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये सकारात्मक बदल होऊ शकतात. तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा काळ चांगला आहे. तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला आर्थिक फायदा होईल. भागीदारीत काम करणाऱ्या लोकांना विशेष फायदा होईल.

वृषभ राशी
शनीची सरळ चाल वृषभ राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये चांगल्या संधी मिळू शकतात. तुमचे वरिष्ठ कामावर खूष राहतील. सहकाऱ्यांचीही साथ मिळेल. कष्टाचे फळ प्रमोशनच्या रूपानं मिळेल. याशिवाय मानसन्मान मिळेल. व्यवसाय करत असल्यास नवे प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे.

कन्या राशी
शनीच्या कृपेनं तुमची व्यावसायिक उद्दिष्टे सहज साध्य होतील. या काळात नवीन रोजगाराचा शोध यशस्वी होऊ शकतो. हे यश तुम्हाला तुमचं ध्येय साध्य करण्यात मदत करेल. परदेशवारीचा योग आहे. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खूष होतील. पगारवाढ व अन्य आर्थिक फायद्याच्या रूपानं तुम्हाला प्रोत्साहन मिळेल.

तूळ राशी
शनीच्या मार्गी होण्यामुळं तूळ राशीतील व्यक्तींना सकारात्मक परिणाम मिळतील. प्रमोशनची संधी मिळू शकते. प्रयत्नांचे फळ नक्की मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. बचतीमध्ये वाढ होईल. परदेशात करिअरच्या संधी मिळू शकतात. व्यवसायात भरघोस नफ्याची शक्यता आहे.

धनु राशी
करिअरच्या नवीन संधी मिळू शकतात. आश्चर्याचे सुखद धक्के बसतील. नोकरीच्या ठिकाणी केलेल्या कष्टाचं फळ मिळेलच, शिवाय वरिष्ठांकडून शाबासकीची थाप मिळेल. नोकरीतील कामाच्या निमित्तानं प्रवास करावा लागेल. त्यातून अनुभवसमृद्ध व्हाल. व्यवसायात मोठा नफा होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment