आजपासून सुरू होणार ‘या’ राशींचे चांगले दिवस! वर्षभर राहाल आनंदी, धनातही होणार वाढ

ज्योतिषशास्त्रात राहु-केतूला पापी आणि मायावी ग्रह म्हटलं जातं. राहु-केतूच्या अशुभ प्रभावाची भीती सर्वांनाच असते, पण असं नाही की राहू-केतू फक्त अशुभ परिणाम देतात. तर राहू-केतू शुभ परिणाम देखील दर्शवतात. जेव्हा राहू-केतू शुभ असतात, तेव्हा अगदी कमनशिबी माणसाचंही भाग्य बदलतं.

ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, शनिदेवानंतर राहू-केतू कोणत्याही एका राशीत सर्वाधिक काळ राहतात. शनि अडीच वर्षांनी आपली राशी बदलतो, तर राहू-केतू दीड वर्षातून एकदा राशी बदलतात. राहू-केतू 18 महिन्यांनंतर विरुद्ध दिशेला जाऊन आपली राशी बदलतात.

राहू-केतूने 30 ऑक्टोबरला आपला मार्ग बदलला. राहु मीन राशीत, तर केतूने कन्या राशीत प्रवेश केला आहे. राहू-केतूची चाल बदलल्यामुळे काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होणार आहेत. राहु-केतुच्या चालीतील बदलामुळे नेमका कोणत्या राशींना अधिक फायदा होणार? याबद्दल जाणून घेऊया.

वृषभ रास

राहु-केतूच्या बदलाचा वृषभ राशीवर चांगला परिणाम होईल. वृषभ राशीला धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. वृषभ राशीच्या लोकांची व्यावसायिक स्थिती सुधारेल, व्यवसायात अनेक लाभ मिळतील. नोकरीत प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. कुटुंबात धार्मिक कार्यं होतील. उत्पन्न वाढवण्याचं साधन विकसित करता येईल. जोडीदाराच्या तब्येतीत सुधारणा होईल. शैक्षणिक आणि बौद्धिक कार्यात चांगले परिणाम मिळतील. तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते.

मिथुन रास

राहु-केतूच्या बदलामुळे वर्षभर मिथुन राशीचं भाग्य देखील उजळणार आहे. मिथुन राशीच्या लोकांचं मन प्रसन्न राहील. तुमचं आयुष्य आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती सुधारेल. नोकरीत बदलाची संधी मिळू शकते. खर्चात कपात होईल आणि कौटुंबिक समस्यांचं निराकरण होईल. शैक्षणिक कार्यात सुधारणा होईल. उत्पन्नवाढीचे अजून एक साधन मिळेल. नोकरीत बढतीची संधी मिळू शकते.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांना शैक्षणिक कार्यात यश मिळेल. तुमचं जीवन आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल. तुम्ही काही वडिलोपार्जित मालमत्ता मिळवू शकता. तुम्हाला मालमत्तेतून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत बदल होण्याचीही शक्यता आहे. तुमच्याकडे असलेल्या वाहनांच्या संख्या वाढू शकतात. व्यवसायात वाढ होईल, लाभाच्या संधी मिळतील. भाऊ-बहिणींचं सहकार्यही मिळू शकतं. मित्राच्या मदतीने धनलाभ होण्याची शक्यता आहे.

कन्या रास

राहु-केतूच्या बदलामुळे कन्या राशीलाही चांगले फायदे होणार आहेत. तुमच्या व्यवसायाची स्थिती मजबूत होत राहील. जीवन आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल. जोडीदाराच्या तब्येतीत सुधारणा होईल. नवीन वाहन मिळण्याचीही शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या वडिलांचा पाठिंबा मिळत राहील. खर्च तुलनेने कमी राहतील. मित्राच्या मदतीने नोकरीत बदलाची संधी मिळू शकते. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात.

Leave a Comment