दिवाळीला कुटुंबात येईल सुख-समृद्धी! धनत्रयोदशीला या शुभ गोष्टींची करा खरेदी

मित्रानो, दसऱ्यानंतर आता सर्वांना दिवाळीचे वेध लागले आहेत. दिवाळी हा लहान-मोठ्या सर्वांसाठी आवडीचा सण आहे. हिंदू धर्मात धनत्रयोदशीचा दिवस खरेदीसाठी सर्वात शुभ मुहूर्त मानला जातो.

धनाची देवता कुबेर आणि औषधाची देवता धन्वंतरी यांची या दिवशी पूजा केली जाते. पंचांगानुसार या वर्षी धनत्रयोदशी 10 नोव्हेंबरला शुक्रवारी आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या 5 वस्तू खरेदी कराव्यात, जेणेकरून माणसाच्या जीवनात सुख-समृद्धी येईल, याविषयी ज्योतिषी आणि पंडित हितेंद्रकुमार शर्मा सांगत आहेत.

दिपावलीच्या दिवशी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे. दरवर्षी या पूजेसाठी नवीन मूर्तीची स्थापना केली जाते. लक्ष्मी आणि गणेशाच्या मूर्ती खरेदी करण्यासाठी धनत्रयोदशी ही सर्वोत्तम तिथी मानली जाते. या दिवशी देवी लक्ष्मी आणि गणपतीच्या आगमनाने घरात सुख-समृद्धी वाढेल.

तुमच्या आयुष्यात कधीही पैसा कमी पडू नये आणि संपत्तीत वाढ व्हावी, अशी तुमची इच्छा असेल तर धनत्रयोदशीच्या दिवशी धने (कोथिंबीरीचे बी) नक्कीच खरेदी करा. या दिवशी धनं खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. पूजेत धनं लक्ष्मीला आणि संपत्ती कुबेरांना अर्पण करावे.

धनत्रयोदशीच्या दिवशी पितळेची भांडी खरेदी करणे आरोग्याच्या दृष्टीने शुभ आणि लाभदायक मानले जाते. पितळ हा भगवान धन्वंतरीचा धातू मानला जातो. पितळेमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आढळतात.

धार्मिक मान्यतांनुसार धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. झाडूला लक्ष्मीचे रूप मानले जाते. या दिवशी खरेदी केलेल्या झाडूने सर्वप्रथम धान्याचे भांडार झाडून घ्यावे असे म्हणतात. असे केल्याने तुमच्या घरात कधीही पैशाचे संकट येणार नाही.

धनत्रयोदशीच्या दिवशी शंख-कवड्या खरेदी करणे शुभ मानले जाते. प्राचीन काळी कवड्यांचा उपयोग पैसा म्हणून केला जात असे. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये या कवड्या अर्पण केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते, असे मानले जाते.

Leave a Comment