1 नोव्हेंबर आज करवा चौथ आणि संकष्ट चतुर्थी एकत्र पत्नीने चंद्राकडे बघून बोला हा मंत्र पतीचे वाढेल आयुष्य!

दिनदर्शिकेनुसार करवा चौथ हा सण कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला साजरा केला जातो. या सणात चंद्राला विशेष महत्त्व आहे कारण महिला दिवसभर निर्जल उपवास केल्यानंतर संध्याकाळी चंद्राची पुजा केल्यानंतर उपवास सोडतात. यावर्षी सर्वार्थ सिद्धी आणि शिवयोगात करवा चौथ साजरी होणार आहे.

विशेष म्हणजे यंदा संकष्टी चतुर्थीचा उपवास करवा चौथच्या दिवशीही केला जाणार आहे. हे व्रत कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला पाळले जाते त्यामुळे आज देशभरात करवा चौथ साजरा होणार आहे. आज सर्वार्थ सिद्धी आणि शिवयोग तयार होत आहे. सर्वार्थ सिद्धी योग सकाळी 06:33 ते 2 नोव्हेंबर रोजी पहाटे 04:36 पर्यंत असेल तर, दुपारी 02:07 पासून शिवयोग सुरू होईल.

विशेष म्हणजे यंदा संकष्टी चतुर्थीचा उपवास करवा चौथच्या दिवशीही केला जाणार आहे. ज्यामुळे करवा चौथचे महत्त्व आणखी वाढते. म्हणजेच या वर्षी जो कोणी करवा चौथच्या दिवशी उपवास आणि पूजा करेल. तसेच त्याला भगवान शिव आणि गणपतीचा आशीर्वाद प्राप्त होईल.

करवा चौथचे महत्त्व
करवा चौथ हा विशेषतः उत्तर भारतीयांमध्ये साजरा केला जातो. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात वट सावित्री साजरी केली जाते असेस महत्त्व करवा चौथला आहे. वैवाहिक सुख प्राप्त होण्यासाठी आणि पतीच्या दिर्घायुष्यासाठी हे व्रत केले जाते. हे व्रत जोडीदारासाठी समर्पण, प्रेम आणि त्याग दर्शवते. स्त्रिया आपल्या पतीच्या सुखी आयुष्यासाठी, सौभाग्यासाठी, उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी दिवसभर उपवास करतात.

स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी चतुर्थी म्हणजेच कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील करवा चौथला सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत हे व्रत करतात. करवा चौथ व्रतामध्ये चंद्राची पूजा केली जाते. असे मानले जाते की या व्रतामध्ये चंद्राची पूजा केल्याने वैवाहिक जीवन सुखी होते आणि पती दीर्घायुषी होतो. त्यामुळे विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात.

या दिवशी चंद्रासोबत गणेश, शिव आणि पार्वती आणि मंगळाचा स्वामी सेनापती कार्तिकेय यांचीही विशेष पूजा केली जाते. करवा चौथशी संबंधित अनेक श्रद्धा आणि परंपरा आहेत, ज्यामुळे तो अधिक खास बनतो. करवा चौथ हा सण प्रामुख्याने पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, गुजरात आणि राजस्थान इत्यादी राज्यांमध्ये साजरा केला जातो.

तर पत्नीने चंद्राकडे बघून हा चमत्कारिक मंत्र जप बोलला तर पतीचे आयुष्य वाढेल. घरात भरभराट होईल. तर तो मंत्र म्हणजेच

ओम सों सोमाय नम:
हा मंत्र चंद्राचा आहे. चंद्राकडे बघून तुम्ही हा मंत्र जर बोलला तर यामुळे आपल्या पतीचे आयुष्य नक्कीच वाढेल. जरी तुमचा उपवास नसेल तरी देखील तुम्ही आपल्या टेरेसवर जाऊन चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राकडे पाहून हा मंत्र जप जर बोलला तर यामुळे आपल्या घरामध्ये भरभराट होईल. तसेच पतीला दीर्घयुष्य प्राप्त होईल. त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. तर हा मंत्र तुम्ही बोला पतीचे आयुष्य नक्कीच वाढेल.

Leave a Comment