कोजागिरी पौर्णिमेपासून ‘या’ राशी होतील कोट्याधीश ! पहा तुमची रास आहे का यात!

From Kojagiri Purnima, ‘Ya’ zodiac signs will become millionaires!
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह जेव्हा गोचर करून दुसऱ्या राशीत किंवा नक्षत्रात प्रवेश करतो तेव्हा काही वेळेस त्यांच्या भ्रमणकक्षेत अन्य ग्रह आल्याने राजयोग तयार होत असतात. येत्या कोजागिरी पौर्णिमेच्या वेळेस सुद्धा असाच एक राजयोग तयार होत आहे पण याचे वैशिष्ट्य म्हणजे हा अत्यंत दुर्मिळ योग असून तब्बल १०० वर्षांनी या आदित्य मंगल योगाची निर्मिती होत आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य देव सध्या तूळ राशीत गोचर करून पोहोचले आहेत जिथे बुध व मंगळ आधीपासूनच स्थिर आहेत. सूर्य व मंगळ एकत्र आल्याने व त्यात बुध प्रभाव असल्याने आदित्य मंगल राजयोग तयार होत आहे व यामुळे कोजागिरी पौर्णिमेपासून तीन राशींना प्रचंड धनलाभासह कोट्याधीश होण्याची शक्यता आहे.

कोजागिरी पौर्णिमेपासून आदित्य मंगल राजयोगाने ‘या’ राशींना होणार प्रचंड धनलाभ

मिथुन रास (Gemini Rashi Bhavishya)
आदित्य मंगल राजयोग हा मिथुन राशीच्या पाचव्या स्थानी तयार होत आहे. आपल्याला या कालावधीत संतती सुखाची प्राप्ती होऊ शकते. मिथुन ही बुधाची स्वगृहीची रास आहे. गूढ विद्या, संगीतकला, लेखन, चित्रकला या विषयातील लोकांनाही उत्तम नावलौकीक प्राप्त होईल. वाहन सुखाची संधी लाभू शकते. स्थावर इस्टेटीतही खूप चांगले बदल होतील. संपत्ती, मालमत्ता, जमीन या रूपात होणाऱ्या धनलाभातून कोट्याधीश होण्याची संधी आहे.

सिंह रास (Leo Rashi Bhavishya)
आदित्य मंगल राजयोग तयार झाल्याने सिंह राशीत सप्तम स्थानी तयार होत आहे. सिंह राशीत राहू अष्टमात असताना केतू राहूच्या समोरच्या स्थानात म्हणजे सप्तमस्थानात असतो. अशा लोकांनी आपल्या बोलण्यावरती संयम ठेवावा. आवेगाने, रागाने बोलून नवे शत्रुत्व निर्माण करू नयेत. कुटुंबात अचानक नवीन जबाबदाऱ्या निर्माण होतील. कोर्टाच्या खटल्यात तुमच्या बाजूने निकाल लागल्याने प्रचंड मोठा धनलाभ होऊ शकतो. सिंह राशीला वाणीच्या माध्यमातून पैसे कमावण्याची संधी आहे.

तूळ रास (Libra Rashi Bhavishya)
तूळ राशीला आदित्य मंगल राजयोग अत्यंत लाभदायक सिद्ध होणार आहे कारण आपल्या राशीच्या प्रथमच स्थानी हा योग तयार होत आहे. आपल्याला मागील अठरा महिन्याच्या काळात खुपसे वाईट अनुभव आले असतील. शारिरीक आजार, मानसिक स्थिती वर खाली होणे या सारख्या गोष्टींना आपल्याला सामोरे जावे लागले होते. मात्र आता कोजागिरीनंतरचा कालावधी आपल्यासाठी सुख समाधान शांती घेऊन येणार आहे. आरोग्यात सुधारणा होईल तर उद्योगधंद्यात नोकरीत कामाचा आवाका सांभाळण्याची उर्जा प्राप्त होईल. विशेष म्हणजे मनाचा उत्साह वाढेल. सर्वांगीण विकासामुळे आपल्याला या कालावधीत प्रचंड मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे.

kojagari laxmi puja 2023 date and time

Leave a Comment