14 ऑक्टोंबर सर्वपित्री अमावस्येला करू नका ही कामे नाहीतर….

मित्रांनो सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि पितृपक्ष हा पंधरा दिवसांचा असतो आणि या काळामध्ये पितरांचा आशीर्वाद आपणाला प्राप्त व्हावा यासाठी अनेक विधी देखील केल्या जातात. तसेच मृत व्यक्तींचे श्राद्ध देखील या पंधरवड्यामध्ये केले जाते. तर या पंधरवड्यामध्ये येणाऱ्याच अमावस्येला सर्वपित्री अमावस्या असे म्हणतात आणि या सर्वपित्री अमावस्येला अशी काही कामे करायची नाहीत जेणेकरून आपल्या जीवनामध्ये त्याचा वाईट परिणाम पाहायला मिळतो. या कामामुळे आपल्याला पितरांचा आशीर्वाद देखील प्राप्त होत नाही. तर ही कामे नेमकी कोणती आहे जी आपल्याला अजिबात करायची नाहीत हे आता सविस्तर जाणून घेऊया.

सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी जर तुमच्याकडे कोणी दान अथवा दक्षिणा मागत असेल तर त्या व्यक्तीला कधीही रिकाम्या हाताने पाठवून द्यायचे नाही. त्या व्यक्तीला तुमच्या ऐपतीप्रमाणे काही ना काही दान द्यायचे आहे.

सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी तुम्ही कांदा, लसूण तसेच दारूचे सेवन अजिबात करायचे नाही. यामुळे आपल्या घराला पितृदोष लागू शकतो. त्यामुळे तुम्ही सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी सात्विक भोजनच करायचे आहे. यामुळे पितरांचा आपणाला आशीर्वाद प्राप्त होतो. पितरांना भोजन अर्पण केल्यानंतरच आपण खावे.

तसेच सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी मुंडन, गृहप्रवेश यांसारखी जी शुभ कामे आहेत ती कामे देखील करायची नाहीत. तसेच नवीन कपडे देखील या सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी खरेदी करायची नाही.

14 ऑक्टोंबर सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी तुम्ही नखे, केस, दाढी अजिबात करू नये.हिंदू धर्मामध्ये पितृपक्षात केस कापू नयेत असे सांगितलेले आहे.

तर मित्रांनो वरील सांगितलेली ही कामे तुम्ही 14 ऑक्टोंबर सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी अजिबात करू नये. यामुळे आपल्या घरामध्ये पितृदोष निर्माण होऊ शकतो. तसेच पितरांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होणार नाही. त्यामुळे तुम्ही चुकूनही ही कामे अजिबात करायची नाहीत.

Leave a Comment