सर्वपित्री अमावस्येला असणार सूर्यग्रहण; ‘या’ राशीच्या व्यक्तींना घ्यावी लागणार काळजी!

हिंदू धर्मामध्ये सर्व सण-समारंभासोबतच सर्वपित्री अमावस्येचे देखील विशेष महत्व आहे. यंदा 14 ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावस्या आहे. या दिवशी पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी त्यासाठी कुटुंबातील मृत व्यक्तिंचे स्मरण करून त्यांच्या नावाने श्राद्ध, पूजा केली जाते.

या दिवशी अनेकजण पितरांसाठी तर्पण देखील करतात. ज्योतिष शास्त्रानुसार, यंदा सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी सूर्यग्रहण असणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व 12 राशींच्या व्यक्तींवर यला मिळेल.

सर्वपित्री अमावस्या तिथी 13 ऑक्टोबर रोजी रात्री 09:50 वाजता सुरू होईल आणि 14 ऑक्टोबर रोजी रात्री 11:24 वाजता समाप्त होईल. त्यामुळे 14 ऑक्टोबरला सर्वपित्री अमावस्या आहे.

सूर्यग्रहण काळात सिंह, कन्या, वृश्चिक, धनु आणि मकर राशीच्या लोकांना काळजी घ्यावी लागेल. या काळात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. तसेच या काळात कोणतेही शुभ कार्य करु नये.

सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी, सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार रात्री 08:34 वाजता सुरू होईल आणि पहाटे 02:25 वाजता संपेल. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे सुतक वैध ठरणार नाही.

Leave a Comment