नामस्मरण नेमकी कोणती माळ घेऊन करावे? नक्की जाणून घ्या

मित्रांनो, आपण प्रत्येक जणच कोणत्या ना कोणत्या देवी देवतांचे भक्त असतो. आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदावी यासाठी व्रत करीत असतो. अनेक मंत्रांचा जप देखील करीत असतो. आपणाला अनेक प्रकारच्या अडचणी आल्या तसेच कोणत्याही कामांमध्ये आपणाला यश प्राप्त होत नसेल तर त्यावेळेस आपण या अडचणींपासून सुटका करून घेण्यासाठी नामस्मरण देखील करीत असतो.

नामस्मरणात इतकी शक्ती असते की नियमित जर तुम्ही नामस्मरण केले तर यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत राहील. तसेच आपणाला कोणतीही मोठ्यात मोठी जरी समस्या आली तर त्या समस्येतून आपण नक्कीच बाहेर पडतो. म्हणजेच आपल्याला येणाऱ्या सर्व अडचणी या दूर होतात. त्यामुळेच बरेच लोक हे नामस्मरणाचा पर्याय अवलंबतात.

नामस्मरणामध्ये खूपच मोठी ताकद असते. तर नामस्मरण करताना विविध माळांचा उपयोग केला जातो. तर नामस्मरण करताना कोणत्या माळा अधिक लाभदायक ठरू शकतात याची आज सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे शास्त्रानुसार नामस्मरण उजव्या हातामध्ये माळ धरून करावा.

मधल्या बोटाच्या मध्या पेरावर ठेवून तिचे मनी आपल्याकडे अंगठ्याने ओढावे. माळेला तर्जनीचा स्पर्श होऊ देऊ नये. अनामिकेवर माळ ठेवून अनामिका आणि अंगठा यांची टोके एकमेकांना जोडावे. नंतर मधल्या बोटाने माळ ओढावी अशी ही नामस्मरणाची पद्धत आहे.

तर मित्रांनो मंगळ ग्रहाच्या शांतीसाठी तुम्ही जर नामस्मरण करणार असाल तर प्रवाळ दगडाच्या जपमाळीने नामस्मरण करावे. जर तुम्हाला मारुतीरायाला प्रसन्न करायचे असेल तर याच माळेने तुम्ही जप करायचा आहे. यामुळे आपल्याला नकारात्मक ऊर्जेपासून मुक्ती मिळते. शंकराच्या पूजेमध्ये आपण शंख आणि मोती वापरतो.

शंखाच्या साह्याने पूजा करणे खूपच शुभ मानले जाते. त्यामुळे मोतीमाळीने तुम्ही जर शंकरांचा जप केला तर आपल्याला सर्व सुखे प्राप्त होतात. तसेच जर आपल्या राशींमध्ये चंद्राशी संबंधित दोष असतील तर ते देखील दूर होतात. काली माता, माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची कमळाच्या फुलांनी पूजा केली जाते. त्यामूळे या देवतांचे नामस्मरण करताना कमळाचे गट्टे माळा घालून पूजा करण्याचा नियम आहे.

जर तुम्हाला सूर्य देवाला प्रसन्न करायचे असेल तर सूर्य देवाच्या मंत्राचा माणिकाच्या माळाने जप केल्यास लाभ होतो. यामुळे पितृदोषापासून मुक्ती मिळते. तर मित्रांनो वरील सांगितलेल्या माळेने जर तुम्ही ज्या त्या देवी देवतांचे नामस्मरण केले तर हे आपणासाठी खूपच लाभदायी ठरते. शुभ फळ आपल्याला प्राप्त होते. अनेक अडचणींपासून आपली सुटका देखील होते.

Leave a Comment