वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा म्हणून सूर्याला ओळखलं जातं. सूर्यदेव हे शनिदेव यांचे पिता मानले जातात. पण जेव्हा जेव्हा हे दोघे एकत्र असतात किंवा एकमेकांसमोर असतात तेव्हा ते खूप नकारात्मक परिणाम देतात, असं म्हटलं जाते. गेल्या एक महिन्यापासून सूर्य आणि शनि एकमेकांपासून १८० अंशांवर होते. याचा सर्व राशींवर परिणाम होत होता.
पण आता चांगली गोष्ट म्हणजे, सूर्य आणि शनीचा अशुभ प्रभाव संपणार असल्याची माहिती आहे. सूर्य आपल्या मित्र कन्या राशीत प्रवेश करेल. यामुळे शनीची वाईट नजर त्यांच्यापासून दूर होईल आणि लोकांना त्याचे शुभ परिणाम मिळू लागतील. सूर्य आणि शनीचा अशुभ संयोग संपल्याने चार राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस येऊ शकतात. पाहूया कोणत्या आहेत या राशी…
मेष राशी
सूर्य आणि शनीचा अशुभ प्रभाव संपल्यामुळे मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप चांगला जाऊ शकतो. घरात सुख समृद्धी नांदताना दिसू शकेल. प्रेम प्रकरणात आणि जोडीदारीच्या व्यवसायात यश मिळताना दिसण्याची शक्यता आहे. तसेच समाजात मान सन्मान वाढू शकतो. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते.
वृषभ राशी
सध्या वृषभ राशीच्या लोकांना नोकरीत नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळू शकतो. अचानक धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. शेअर बाजारातून चांगला परतावा मिळू शकतो. तसेच जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ पदरी पडू शकतो.
मिथुन राशी
मिथुन राशीच्या लोकांना या काळात त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याच्या चांगल्या संधी मिळू शकतात. आर्थिक स्थिती या काळात सुधारु शकते. प्रत्येक क्षेत्रात हवं तसं यश मिळताना दिसू शकतो. पदोन्नतीसोबत इंक्रीमेंट मिळू शकते. गेल्या काही दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात.
तूळ राशी
तूळ राशीच्या लोकांच्या अपूर्ण इच्छा या काळात पूर्ण होऊ शकतात. तसेच, या काळात तुम्हाला जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत प्रगती होऊ शकते आणि पदोन्नती किंवा आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. या काळात आरोग्य आणि पैशाशी संबंधित समस्या संपू शकतात.