आजपासून 16 नोव्हेंबरपर्यंत या राशींचा भाग्योदय! सगळं स्वप्न होणार पूर्ण

मित्रानो, ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा सेनापती मंगळ आज संध्याकाळी वायु राशीत म्हणजे तूळ राशीत संक्रमण करणार आहे. संध्याकाळी 05:12 वाजता कन्या राशीतून तो तूळ राशीत प्रवेश करणार आहे. तूळ राशी मंगळ 16 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. मंगळ गोचरमुळे काही राशींचे अच्छे दिन सुरु होणार आहे.

साहस आणि शौर्याचा कारक मंगळ संक्रमणामुळे काही राशींना बक्कळ धनलाभासोबत अनेक लाभ होणार आहे. मंगळाचा प्रभाव या राशींसाठी अच्छे दिन घेऊन आला आहे. या भाग्यशाली राशीत तुमची रास आहे का जाणून घ्या.

वृषभ
मंगळ गोचर वृषभ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरणार आहे. गुप्त शत्रू तुमचं नुकसान करु शकणार नाहीत. तर कार्यक्षेत्रात तुम्हाला चांगला परिणाम दिसून येणार आहे. कामासाठी तुम्हाला बाहेर गावी जाण्याची वेळ येणार आहे. या प्रवासातून तुम्हाला लाभ होणार आहे. मंगळ गोचर तुमच्यासाठी यशाची पायरी घेऊन आला आहे.

मिथुन
मंगळ गोचर या राशीसाठी खूप भाग्यशाली ठरणार आहे. या काळात तुम्हाला चांगला नफा मिळणार आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय इत्यादी क्षेत्रांशी संबंधित लोकांना सर्वाधिक फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांची परदेशातून शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होणार आहे. आर्थिक लाभासाठी हा काळ उत्तम असणार आहे.

कर्क
मंगळ ग्रह जमीन, मालमत्ता, वाहन, विलास आणि माता याचा कारक आहे. कर्क राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण खूप फायदेशीर ठरणार आहे. घर, वाहन किंवा मालमत्ता खरेदीसाठीही हा काळ चांगला असणार आहे. व्यवसायात प्रगतीसाठी हा काळ भाग्यशाली ठरणार आहे. व्यावसायिकांना फायदा होणार आहे.

सिंह
या राशीच्या लोकांसाठी मंगळ गोचर भाग्यशाली ठरणार आहे. डिजिटल मीडिया, वकिली इत्यादी संपर्क क्षेत्राशी संबंधित असलेल्या लोकांना यश प्राप्त होणार आहे. नातेवाईकांकडून मदत होणार आहे. अत्यंत कठीण परिस्थितीतही तुम्ही विजय मिळवणार आहात. तुमच्यात आत्मविश्वासाची वाढणार आहे. तुमच्या धार्मिक कार्यात रस वाढणार आहे.

तूळ
मंगळ गोचर तुमच्या राशीत प्रवेश करणार असल्याने तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे. मालमत्ता किंवा वाहनाच्या खरेदी-विक्रीतून नफा मिळणार आहे. तुम्हाला आईकडून पूर्ण सहकार्य मिळणार आहे. व्यवसाय भागीदारी करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला असणार आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराची पूर्ण साथ मिळत आहे. या काळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात लाभ मिळणार आहे.

Leave a Comment