मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्ष हा पंधरा दिवसांचा साजरा केला जातो. यामध्ये अनेक विधी करून पितरांचा आशीर्वाद प्राप्त केले जातात. पंधरा दिवस हे पितृपक्षाचे असतात आणि यामध्ये अनेक प्रकारची विधी केल्या जातात. जेणेकरून आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. पितरांचा आशीर्वाद प्राप्त झाल्यामुळे येणारे वर्षे पूर्ण आपल्याला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागत नाही. तसेच पितरांचा आपल्याला आशीर्वाद देखील प्राप्त होते.
वर्षातील पंधरा दिवस पितृपक्ष खूप महत्त्वाचा मानला जातो. पितृपक्षाच्या काळात अनेक जण आपल्या पितरांच्या शांतीसाठी विविध प्रकारचे उपाय करत असतात. परंतु या पितृपक्षाच्या काळात प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न येतो की ज्या पितरांना पुत्र होत नाहीत त्यांचं श्राद्ध आणि विधी कोण करणार? धार्मिक शास्त्रनुसार सून किंवा पत्नीला ही श्राद्ध करण्याचा अधिकार असू शकतो का?
शिवाय पितरांच्या पूजेसाठी विविध प्रकारचे नियम आणि अधिकार ग्रंथांमध्ये सांगितलेले आहेत. यामध्ये वर्षभरात श्राद्धासाठी किती दिवस असतात कोण कोणाचे श्राद्ध करू शकतो हे सुद्धा सांगितले गेलेय. या सोबतच पितृपक्षात श्राद्ध करता येत नसेल तर पितर संतुष्ट होण्यासाठी काय करावे याचाही उल्लेख आहे. श्रद्धासंबंधी शास्त्रनुसार या सर्व प्रश्नांची उत्तर चला जाणून घेऊयात.
पितृपक्षात पितरांच्या शांतीसाठी श्राध्द, पिंडदान इत्यादी विधी करण महत्त्वाच आहे. अशी धार्मिक धारना आहे. पितृपक्षात पितरांचा आदर आणि शांती करण्यासाठी कुटुंबातील सदस्य श्राद्ध अर्पण पिंडदान आधी करत असतात. अस मानल जात की या कृती केल्याने वर्षभर पितरांची कृपा कुटुंबावर राहते आणि अडथळे सुद्धा दूर होत असतात. कारण पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये पूर्वज पृथ्वीवर येत असतात म्हणून त्यांचा सन्मान करण्यासाठी विधी केली जातात.
पण वडिलांना मुलगा किंवा नातू नसताना अनेक कुटुंबात संकट निर्माण होऊ शकतात अशा परिस्थितीत विधी कोण करणार तर गरुड पुरानात त्याच उत्तर मिळत. गरुड पुराण या धार्मिक ग्रंथानुसार एक श्लोक आहे हा श्लोक आहे, पुत्राभावे वधू कुर्यात, भार्याभावे या सोदन:| शिष्यों वा ब्राह्मणा: सपिण्डो वा समाचारेत॥ जेष्ठस्य वा कनिष्ठस्य भ्रातृ: पुत्रश्य: पौत्रके| श्राध्यामात्रदिकम कार्य पुत्रहीनेत खग:॥ म्हणजेच जो पितृपक्षात मुलगा नसतानाही तर्पण पिंडदान आणि श्राद्ध यांसारख जे वडिलांचे विधी करू शकतात.
या बरोबरच मोठा किंवा लहान मुलगा नसताना सून आणि पत्नीला ही श्राद्ध करण्याचा अधिकार आहे. यामध्ये मोठी मुलगी किंवा एकुलती एक मुलगी यांचाही समावेश आहे. जर पत्नी हयात नसेल तर भाऊ, पुतणे, नातू, पुतणे यांनाही श्रद्धा विधी करण्यास पात्र मानल गेलय.
शिवाय शास्त्रानुसार श्राद्ध पिंडदान आणि विधी करताना महिलांनी विधी करताना काही गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. जसे पितृपक्षात त्यांनी पांढरी कपडे किंवा पिवळ्या रंगाची कपडे घालावेत. याशिवाय तर्पण करताना महिलांनी हे लक्षात ठेवायला हव की त्यांनी पाण्यात कुशव व काळे तील टाकू नये. कारण तसे करणे शास्त्रानुसार निषध मानल गेलय. मित्रांनो तर अशा प्रकारे ज्यांना मुलगा, नातू नसेल त्यांनी पितृपक्षात श्राद्ध कराव.