पितृपक्षात कोणत्याही दिवशी महिलांनी आपल्या मुलांवरून ही एक वस्तू ओवाळवून घराच्या छतावर ठेवावी, पितृदोष होणार नाही

मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक रूढी परंपरा पूर्वीपासून चालत आलेले आहेत आणि आपल्यातील प्रत्येक जण हे या रूढी परंपरांचे पालन करीत देखील आहे. तर काहीजण याकडे दुर्लक्ष देखील करीत असतात. तर दरवर्षी पितृपक्ष हा पंधरा दिवसांचा असतो. पितृपक्षाला सुरुवात 29 सप्टेंबर पासून सुरू झालेली आहे आणि पंधरा दिवसांचा हा पितृपक्ष असतो.

या पितृपक्षांमध्ये पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या पूजा विधी केल्या जातात. तसेच अनेक प्रकारचे दान देखील या पितृपक्षांमध्ये केले जातात. जेणेकरून पितरांचा आपल्यावर आशीर्वाद प्राप्त होईल. पितरांचा आशीर्वाद प्राप्त झाल्यामुळे आपणाला वर्षभरात कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागत नाही. तसेच येणारे वर्ष हे आपल्याला सुखा समाधानचे जाते.

त्यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अनेकजण पितृपक्षात अनेक प्रकारच्या सेवा देखील करीत असतात. तर पितृ पक्षांमध्ये घरातील महिलांनी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी तसेच त्यांना पितृदोष याचा सामना करावा लागू नये यासाठी एक उपाय करायचा आहे आणि हा उपाय पितृ पक्षांमध्ये करायचा आहे.

म्हणजेच पितृपक्षातील पंधरा दिवसांमध्ये कोणत्याही एका दिवशी म्हणजे तुम्हाला ज्या वेळेस वेळ मिळेल त्या दिवशी तुम्ही हा उपाय केला तरीही चालतो. तर त्यासाठी तुम्हाला एक वाटी भात शिजवून घ्यायचा आहे आणि या भातामध्ये तुम्ही मीठ अजिबात घालायची नाही. फक्त पाण्यामध्ये हा भात शिजवायचा आहे. त्यामध्ये तेल, मीठ, तूप काहीही घालायचे नाही आणि एक वाटी भात तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे.

आणि तो एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि नंतर तुम्हाला आपल्या घरातील मुलांना एका खुर्चीवर बसून घड्याळाच्या काटा ज्याप्रमाणे फिरतो त्याप्रमाणे हा भात गोलाकार डोक्यापासून पायापर्यंत तुम्ही ओवाळून घ्यायचा आहे आणि तीन वेळा तुम्हाला हा भात आपल्या मुलांवरून ओवाळून घ्यायचा आहे आणि नंतर तो भात एका कागदावर किंवा एखाद्या पानावरती तुम्ही काढून ते पान किंवा तो कागद तुम्ही आपल्या घराच्या छतावर ठेवायचे आहे.

जेणेकरून पशुपक्षी तो भात खातील. जर तुमच्या घरामध्ये एकापेक्षा अधिक मुले असतील तर तुम्ही एक वाटीच भात शिजवून तो भात पहिल्यांदा एका मुलावरून तीन वेळा ओवळून घ्यायचे आहे. नंतर दुसऱ्या मुलावर तीन वेळा ओवळून घ्यायचे आहे. असे तुम्ही ओवळून घेऊ शकता.

या उपायामुळे तुमच्या मुलांना पितृदोषाचा सामना करावा लागणार नाही. तसेच त्यांच्या जीवनामध्ये देखील कोणतेही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत आणि आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्या मुलांवरती सदैव राहील. तर हा उपाय तुम्ही अवश्य करून पहा.

Leave a Comment