नवीन माणसाने स्वामींची सेवा कशी करावी? कोणती सेवा करावी?

मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे स्वामींचे सेवेकरी भक्त आहेत. स्वामींवर आपली अगदी नितांत श्रद्धा भक्ती असते. स्वामी आपल्या सदैव पाठीशी राहतील आणि आपल्या संकटातून अडचणीतून आपली सुटका देखील करतील असा विश्वास हा प्रत्येक स्वामी भक्ताला हा असतो. प्रत्येकाची इच्छा अशी असते की स्वामींची आपण सेवा करावी. ज्यामुळे स्वामींचा कृपाशीर्वाद आपल्यावर सदैव राहील.

आपल्यापैकी बरेच जणांना अशी इच्छा असते परंतु स्वामींची कोणती सेवा करावी आणि ती सेवा कशी करावी? याबद्दल अनेकांना माहिती नाहीये. म्हणजेच स्वामींचे जे नवीन सेवेकरी आहेत त्यांनी स्वामींची कोणती सेवा करावी आणि ती सेवा कशी करावी याविषयीची आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे.

जर तुम्ही देखील स्वामींची सेवा करणार असाल तुमची जर इच्छा असेल तर ही सेवा तुम्ही अवश्य करा. तर यासाठी स्वामींचे जे नवीन सेवेकरी आहेत त्यांची इच्छा असेल की स्वामींची सेवा करावी तर त्यांनी अगोदर एक दिवस निवडायचा आहे. शक्यतो करून तुम्ही गुरुवारचा दिवस निवडायचा आहे आणि या दिवसापासून तुम्ही स्वामींची सेवा करण्यास सुरुवात करावी.

तर या स्वामींच्या सेवेमध्ये तुम्ही तीन गोष्टी करायचे आहेत. तर यासाठी तुम्हाला एक माळ आवश्यक आहे. तसेच नित्यसेवा ही पोथी देखील आवश्यक आहे. तर तुम्ही गुरुवारपासून स्वामींची सेवा करू शकता आणि ही जी स्वामींची सेवा आहे ही सेवा जर तुम्ही केला तर तुम्हाला देखील स्वामींचा कृपाशीर्वाद तुमच्यावर राहील.

तर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी ही सेवा करू शकता. कोणत्याही म्हणजे सकाळी जर तुम्ही ही सेवा केला तर तुम्ही दुसऱ्या दिवशी देखील सकाळीच ही सेवा करायची आहे. तर सकाळ संध्याकाळ कोणत्याही वेळेत तुम्हीही सेवा करू शकता. तर पहिल्यांदा तुम्हाला स्वामी समर्थांच्या फोटोसमोर मूर्ती समोर बसायचे आहे. दिवा अगरबत्ती करायची आहे आणि पहिल्यांदा स्वामींच्या तारक मंत्राचा एक वेळेस जप करायचा आहे.

हा तारक मंत्र तुम्हाला नित्यसेवा पोथीमध्ये नाही मिळाला तर तुम्ही गुगल वरती सर्च करून तारक मंत्र एक वेळेस बोलायचं आहे आणि त्यानंतर कालभैरव अष्टक एक वेळेस वाचायचे आहे. कालभैरव अष्टक हे तुम्हाला स्वामींच्या नित्यसेवा पोथीमध्ये अवश्य मिळेल. तर एक वेळेस तुम्हाला कालभैरव अष्टक वाचायचे आहे.

त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला एक माळ करायचा आहे. फक्त या तीन गोष्टी तुम्ही दररोज करायचे आहेत. अशी ही स्वामींची सेवा तुम्ही करू शकता. जर तुम्ही नवीन सेवेकरी असाल, तुम्हाला स्वामींची कोणतीही सेवा माहिती नसेल परंतु स्वामींची सेवा करण्याची इच्छा असेल तर तुम्ही ही सेवा अवश्य करा.

यामुळे स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील आणि स्वामी हे तुमच्या प्रत्येक अडचणीतून तुम्हाला मार्ग दाखवत राहतील. तर ही स्वामींची सेवा तुम्ही दररोज न चुकता आवश्य करा.

Leave a Comment