पितृपक्षात अमृत व सर्वार्थ सिद्धी योग बनल्याने ‘या’ राशींना लाभणार वाडवडिलांची कृपा! होऊ शकतात श्रीमंत

मित्रानो, धार्मिक मान्यतेनुसार पितृ पक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो. जो अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो. पितृ पक्ष किंवा श्राद्ध काळ सुमारे १६ दिवस असतो. यंदा २९ सप्टेंबर २०२३ पासून पितृपक्ष सुरु झालेला आहे. तर नवरात्रीच्या एक दिवस आधी म्हणजेच १४ ऑक्टोबरला पितृपक्ष संपणार आहे. विशेष म्हणजे याच दिवशी वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण सुद्धा लागणार आहे. ज्योतिषानुसार, पितृ पक्षाच्या १५ दिवसातील ग्रह- नक्षत्रांची स्थिती ही विशेष असणार आहे.

३० वर्षांनी पहिल्यांदाच या पंधरवड्यात सर्वार्थ सिद्धी योग व अमृत सिद्धी योग तयार होणार आहे. या दोन्ही शुभ योगाच्या प्रभावाने पितृ पक्षात काही राशींच्या भाग्याला कलाटणी मिळणार असून प्रचंड धनप्राप्तीची संधी आहे. यंदाचा पितृपक्ष नक्की कोणत्या राशींसाठी शुभ सिद्ध होणार आहे हे पाहूया.

मेष रास
मेष राशीला पितृ पक्षात आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत. मुख्यतः तुमचे उधार दिलेले पैसे परत मिळून धनलाभ होऊ शकतात. व्यवसाय वृद्धीसाठी तुम्हाला नवनवीन लोकांशी संपर्क साधता येईल. वाणीवर नियंत्रण ठेवा. घरी तुमच्या मताला किंमत मिळेल अशी एखादी घटना घडू शकते.

मिथुन रास
मिथुन राशीसाठी येणारा १५ दिवसांचा कालावधी नोकरी- व्यवसायासाठी लाभदायक सिद्ध होऊ शकतो. आर्थिक लाभ मिळाल्याने यंदाची दिवाळी तुम्ही अगदी जोशात साजरी करू शकता. वाडवडिलांच्या जमिनीच्या रूपात तुम्हाला धनलाभाचे योग आहेत.

कर्क रास
कर्क राशीच्या मंडळींना ऑक्टोबरच्या दोन्ही आठवड्यांमध्ये प्रगतीची संधी आहे. नोकरदार मंडळींना प्रलंबित पगारवाढ किंवा बोनसच्या स्वरूपात धनलाभ होऊ शकतो. समाजातील आपले स्थान मजबूत होऊ शकते. तुमच्या नशिबात बदलाचे संकेत आहेत.

कन्या रास
कन्या राशीला केवळ पितृपक्षच नव्हे तर ऑक्टोबरचा संपूर्ण महिना हा सोन्याहून पिवळा सुखाचा काळ घेऊन येणारा असू शकतो. तुम्ही वैवाहिक आयुष्यात सुख व शांती अनुभवू शकता, आणि मुख्यतः जोडीदाराच्या रूपातच धनलाभाची चिन्हे आहेत. कौटुंबिक सुखाने भारावून टाकणारा असा हा कालावधी असणार आहे.

कुंभ रास
कुंभ राशीला या कालावधीत जुन्या त्रास व प्रश्नांपासून मुक्ती मिळू शकते. ताण- तणाव दूर होईल व कर्माचे फळ मिळू शकते. तुमच्या मेहनतीला योग्य तो मोबदला मिळवून देणारा असा हा कालावधी आहे. तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. घरी शांततेचे वातावरण असेल.

Leave a Comment