गणपतीपूर्वी ‘या’ राशींवर होणार बाप्पाची कृपा! लॉटरी, धनलाभ होईल

मित्रानो, नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य स्वराशीत म्हणजेच सिंह राशीत असून, नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध हाही सिंह आहे. मात्र, बुध वक्री चलनाने मार्गक्रमण करत होता. आता बुध सिंह राशीत मार्गी होत आहे. अगदी अलीकडे बुध सिंह राशीत उदय झाला होता.

सिंह राशीत बुधाचा उदय होतानाच सूर्याने उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश केला आहे. या नक्षत्राचा सूर्यच स्वामी आहे. मात्र, यातच गणेश चतुर्थीच्या आधी बुध सिंह राशीत मार्गी होत आहे. गणेशोत्सवापूर्वी मार्गी होत असलेला बुध काही राशींसाठी अतिशय शुभ मानला गेला आहे.

१६ सप्टेंबर रोजी बुध मार्गी होत आहे. धन आणि समृद्धी वृद्धीसाठी हा काळ शुभ ठरू शकेल. तसेच गणपती बाप्पाचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतील. बुध आणि गणपती कृपेने काही राशींना आगामी कालावधी लाभदायक, फायदेशीर आणि यश-प्रगतीकारक ठरू शकतो. जाणून घेऊया.

मेष राशी
शुभ परिणाम मिळू शकतील. आर्थिक लाभाच्या रूपात बाप्पाचा आशीर्वाद मिळेल. लोक आदर करतील. समाजात प्रतिष्ठा वाढेल. करिअरमध्येही काही उत्तम संधी मिळू शकतात. अध्यात्मिक बाबींमध्ये रस असेल. करिअरमध्ये संघर्ष करणाऱ्या लोकांसाठी मार्ग सोपा होईल. पगारही वाढण्याची अपेक्षा आहे. कौटुंबिक सदस्यांसोबत चांगले सामंजस्य प्रस्थापित होईल. आर्थिक लाभ अपेक्षित आहे. ज्यांना कामानिमित्त परदेशात जायचे आहे त्यांना यश मिळण्याची अपेक्षा आहे.

मिथुन राशी
शुभ परिणाम दिसून येतील. पैशाच्या बाबतीत खूप फायदा होऊ शकेल. लॉटरी लागू शकते किंवा कुठूनतरी भरपूर पैसे मिळू शकतात. करिअरमध्ये नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. रखडलेली पेमेंट किंवा पूर्वी केलेल्या गुंतवणुकीवर उत्कृष्ट परतावा मिळण्याची अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळू शकतील. नोकरी करणाऱ्यांना चांगली ऑफर मिळू शकते. कोणत्याही कामात घाई करणे महागात पडू शकते. प्रत्येक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या.

सिंह राशी
उत्तम संधी प्राप्त होतील. करिअरवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकाल. काम तन्मयतेने करू शकाल. अचानक पैसेही मिळू शकतात. ऑफिसमध्ये चांगले वातावरण असेल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना संधी मिळेल. प्रतिष्ठा वाढेल. कामाची प्रशंसा होऊ शकेल. व्यवसाय करत असाल तर नवीन व्यवसायिक योजना बनवू शकाल. त्यात नफा मिळेल. विरोधकांना कडवी टक्कर देऊ शकाल. गुंतवणुकीसाठी ही चांगली वेळ आहे, चांगला परतावा मिळेल.

तूळ राशी
करिअरबाबत चांगली बातमी मिळण्याची आशा आहे. जे लोक बर्‍याच दिवसांपासून नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांना त्यांच्या आवडीची नोकरी मिळू शकते. व्यवसायात काही नवीन संधी मिळतील. वैयक्तिक जीवनात सर्व काही संतुलित राहील. करिअर यशस्वी करण्यासाठी नवीन संधी मिळतील. मित्र उपयुक्त ठरतील. कार्यालयातील सहकाऱ्यांसोबतचे संबंध सौहार्दपूर्ण राहतील. कल्पना यशस्वी होतील.

मकर राशी
करिअरचा हा टप्पा थोडा कठीण असू शकतो. वैयक्तिक व्यस्ततेमुळे कामावर जास्त लक्ष केंद्रित करू शकणार नाही. अधिकारी नाराज होऊ शकतात. वैवाहिक जीवनात थोडी कटुता निर्माण होऊ शकते. पैशाच्या बाबतीत खर्च लक्षणीय वाढू शकतात. आरोग्याची काळजी घ्यावी.

Leave a Comment