देव्हाऱ्यात या वस्तू असायलाच हव्यात राहील माता लक्ष्मीची कुटुंबावर अखंड कृपा!

मित्रानो, घराचा देव्हारा हा कुटुंबाच्या सुख, शांती आणि समृद्धीचा केंद्रबिंदू मानला जातो. अध्यात्मिक चैतन्य जागृत करायचं असो, मानसिक शांती मिळवायची असो, भगवंताचा आशीर्वाद मिळवायचा असो किंवा दु:खाशी लढण्यासाठी आत्मविश्वास मिळवायचा असो, या सगळ्यासाठी घरातील देव्हारा किंवा पूजास्थान हेच उत्तम ठिकाण मानलं जातं.

घरच्या देव्हाऱ्यात अशा काही वस्तू ठेवाव्यात, ज्यामुळे लक्ष्मीची कृपा होईल. त्यामुळे आपल्या जीवनात संपत्ती, आनंद आणि समृद्धी मिळेल. लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी घरच्या देव्हाऱ्यात कोणत्या वस्तू ठेवाव्यात.

घरातील देव्हाऱ्यात किंवा पूजेच्या ठिकाणी लक्ष्मीसोबत गणेशाची मूर्ती ठेवावी. श्री गणेश हा माता लक्ष्मीचा दत्तक पुत्र असून त्याला माता लक्ष्मीकडून वरदान मिळाले आहे की, जिथे जिथे गणपती बाप्पाची पूजा केली जाईल.तिथे माता लक्ष्मीचा कायमचा वास असेल.

शाळीग्राम हा भगवान विष्णूचा अवतार मानला जातो. शाळीग्रामची पूजा केल्यानं देवी लक्ष्मी प्रसन्न होते. तुळशीसह शाळीग्रामची पूजा केल्यानं घरात सुख-समृद्धी येते. यासाठी शाळीग्राम देव्हाऱ्यात ठेवून पूजा करावी.

देवी लक्ष्मीला पिवळ्या कवड्या आवडतात. जर पिवळी कवड्या नसतील तर पांढऱ्या कवड्यांवर हळद लावू शकता. लक्ष्मीच्या पूजेच्या वेळी पिवळ्या कवड्या अर्पण कराव्यात. यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. संपत्ती आणि समृद्धी मिळविण्यासाठी तुम्ही या कवड्या तिजोरीत ठेवू शकता.

तुम्ही पूजाघर किंवा देव्हाऱ्यात मोराची पिसे ठेवू शकता. भगवान श्रीकृष्णाला मोराची पिसे प्रिय आहेत आणि तो भगवान विष्णूचा अवतार मानला जातो. मोराची पिसे ठेवल्यानं नकारात्मकता दूर होते.

शंख देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे, कारण शंख हा लक्ष्मीचा भाऊ मानला जातो. समुद्रमंथनादरम्यान लक्ष्मी देवीसोबत शंखही बाहेर पडला. जिथे शंख ठेवला जातो तिथे लक्ष्मीचा वास असतो. पूजेत याचा वापर केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते, अशी श्रद्धा आहे.

धार्मिक श्रद्धेनुसार गंगाजल वापरल्याने गरिबी दूर होते. गंगाजलाने सर्व पापे नष्ट होतात, रोग व दोषही नाहीसे होतात. यासाठी देव्हाऱ्यात गंगाजल अवश्य ठेवावे.

कुबेर हा संपत्तीचा देव मानला जातो, तो संपत्तीचा रक्षक असतो. तो अक्षय संपत्तीचा प्रतीक देखील आहे. जर तुम्हाला तुमची संपत्ती स्थिर राहावी, वाढावी पण कमी होऊ नये, असे वाटत असेल तर घरातील देव्हाऱ्यात कुबेर यंत्र बसवा आणि त्याची नियमित पूजा करावी.

Leave a Comment