मित्रांनो, आपल्यापैकी खूप जण हे स्वामींचे भक्त आहेत. अगदी मनोभावे व श्रद्धेने स्वामींची सेवा करण्यासाठी कायम तत्पर राहतात. आपल्या इच्छा पूर्ण कराव्यात, आपल्या घरामध्ये कायम सुख, समृद्धी, आरोग्य व पैशाची बरकत राहावी यासाठी भक्त जण स्वामींची सेवा करीत असतात. स्वामींची सेवा केल्याने प्रत्येकाचे मन प्रसन्न होते. परंतु स्वामींची सेवा करीत असताना या सेवेचा आपणाला फायदा होईल का? याचा विचार करणे चुकीचे आहे.
अगदी भक्तिभावाने तुम्ही स्वामींची सेवा करायला हवी. स्वामींना प्रसन्न करण्यासाठी आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे. जेणेकरून तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. स्वामींचा कृपा आशीर्वाद तुम्हाला लागेल. चला तर मग पाहूयात कोणती आहे ही सेवा. मित्रांनो, प्रत्येकाने लवकर उठून स्नान करून देवपूजा अवश्य करावी.
सकाळी उठल्यानंतर स्वामींचे दर्शन नक्की घ्यावे. स्वामी भक्तांची सेवा पाहत असतात. जो भक्त अगदी मनोभावे सेवा करतो. स्वामी त्यांच्यावर लगेच प्रसन्न होतात. तर मित्रांनो आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला देवघरासमोर बसायचे आहे. दिवा, अगरबत्ती, कापूर, धूप लावायचा आहे आणि हात जोडून स्वामींना प्रार्थना करायची आहे. आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी, संकटे दूर करण्यासाठी.
तसेच तुम्हाला स्वामींचा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करायचा आहे. या मंत्राचा जाप तुम्हाला तीन माळ करायचा आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तीन वेळेस जप झाल्यानंतर तुम्हाला अक्कलकोट स्वामी समर्थांचा मंत्र अगदी मनोभावे व श्रद्धेने म्हणायचा आहे. अक्कलकोट स्वामी समर्थांचा मंत्र तुम्हाला एक वेळेस म्हणायचा आहे व त्यानंतर तारक मंत्राचा जप देखील तुम्हाला करायचा आहे.
या मंत्राचा जाप एक वेळेस करायचा आहे. मंत्राचा जप करून झाल्यानंतर अगदी मनोभावे तुम्हाला नमस्कार करायचा आहे. स्वामी समर्थ म्हणजेच दत्तांचे एक रूप. स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या पाठीशी कायम उभे राहतात. त्यांच्या अडीअडचणी दूर करतात. परंतु भक्तांनी अगदी श्रद्धेने स्वामी वर विश्वास ठेवून सेवा करावी.
तर मित्रांनो, तुम्हाला देखील काही अडीअडचणी व इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि स्वामींची कृपा आशीर्वाद आपल्यावर होईल. आपले कुटुंब कायम सुखी रहावे असे वाटत असेल तर स्वामींचा ही स्वामींची ही छोटीशी सेवा करा. नक्कीच स्वामींची कृपा तुमच्यावर होईल व तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.