उजव्या हातात पाणी घेऊन संकल्प सोडून स्वामींची तीन महिन्यांची ही सेवा करा; परिवार सुखी होईल!

मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे स्वामींचे भक्त आहेत. आपण स्वामींच्या अनेक सेवा करीत असतो. मंत्रांचा जप देखील करीत असतो. तर आज मी तुम्हाला स्वामींची अशी एक सेवा सांगणार आहे ही सेवा घरातील महिलांनी करायची आहे. ही जर सेवा यांनी केली तरी यामुळे यांच्या घरातील सर्व काही अडीअडचणी दूर होतील. दारिद्र्य निघून जाईल. तसेच त्यांच्या माहेरी देखील सुख समृद्धी प्राप्त होणार आहे.

तर ही जी सेवा आहे ही सेवा तीन महिने करायची आहे आणि संकल्प करूनच मग ही सेवा तुम्ही तीन महिने पूर्ण करायचे आहे. घरातील कोणत्याही व्यक्तीने केली तरीही चालते. परंतु महिलांनी म्हणजेच विवाहित महिलांनी ही जर सेवा केली तर त्यांच्या सासरी आणि माहेरी दोघांनाही याचा पुरेपूर फायदा होऊ शकतो.

तर तुम्ही ही सेवा चालू करताना अगोदर संकल्प करायचा आहे. म्हणजेच तुम्ही गुरुवारी ही सेवा चालू करायची आहे आणि गुरुवारच्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे. तर तुम्ही सेवा सकाळी किंवा संध्याकाळी कधीही करू शकतात. तर गुरुवारच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून स्नान वगैरे आटपून दिवा अगरबत्ती आपल्या देवघरासमोर लावायचे आहे. देवपूजा करायचे आहे.

स्वामींच्या मूर्तींना हार घालायचा आहे आणि स्वामींसमोर बसायचे आहे. एक ताम्हण आणि एक तुम्हाला तांब्याभर पाणी घ्यायचे आहे आणि नंतर तुम्हाला या तांब्यातील थोडेसे पाणी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि आपण स्वामींना सांगायचे आहे की, मी तुमची तीन महिन्यांची सेवा करणार आहे आणि तुमच्या ज्या काही अडीअडचणी असतील, संकटे असतील ती सर्व संकटे स्वामींना सांगायची आहेत आणि ही संकटे दूर व्हावीत अशी प्रार्थना करायची आहे आणि नंतर हे पाणी तुम्हाला आपल्या ताम्हणांमध्ये सोडायचे आहे.

नंतर तुम्ही ते ताम्हण बाजूला ठेवून तुम्ही दोघेरासमोर बसूनच श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला तीन माळी करायचा आहे आणि त्यानंतर तारक मंत्राचा जप एक वेळेस बोलायचं आहे आणि तुम्हाला नंतर नमस्कार करून देवघरासमोरून उठायचे आहे आणि ताम्हणातील पाणी तुळशीला घालायचे आहे आणि हा आपला संकल्प पूर्ण झाला.

तर तुम्ही हा संकल्प फक्त पहिल्या दिवशी करायचा आहे आणि नंतर दुसऱ्या दिवशीपासून तुम्हाला तीन महिन्यांची स्वामींची ही सेवा करायची आहे. त्यामध्ये फक्त मग तुम्ही स्वामींच्या श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आकरा माळी जप करायचा आणि लगेचच तारक मंत्र एक वेळेस बोलायचं आहे. असे सलग तीन महिने तुम्ही चालू ठेवायचे आहेत आणि तीन महिने तुम्हाला गाईला आणि कुत्र्याला एक एक चपाती दररोज न चुकता खाऊ घालायचे आहे.

काही सुतक वगैरे आले तर तुम्ही सेवा करायची नाही आणि सुतक संपल्यानंतर त्या दिवसांपासून मग तुम्ही सेवा परत चालू करू शकता. तर अशी ही तीन महिन्यांची सेवा जर तुम्ही केला तर यामुळे तुमच्या जीवनामध्ये सुख-समृद्धी नांदेल आणि घरातील विवाहित महिलांनी जर ही सेवा केली तर यामुळे त्यांच्या सासरी आणि माहेरी पुरेपूर याचा लाभ होणार आहे. तर स्वामींची ही विशेष सेवा तुम्ही अवश्य करा.

Leave a Comment