मित्रानो, ग्रह एका विशिष्ट वेळी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. वैदिक ज्योतिष शास्त्रासार या बदलांचा परिणाम प्रत्येक राशीवर कमी-अधिक प्रमाणात होत असतो. येत्या काही दिवसात प्रभावी असणारा सूर्यग्रह एका पाठोपाठ एक अशा दोन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. पाहूया या बदलांमुळे कोणत्या राशीवर सूर्यदेवांची कृपा होणार आहे.
प्रत्येक महिन्यात सूर्य विविध राशीत प्रवेश करतो. १७ सप्टेंबरला सूर्याच्या चालीत बदल होणार आहे. सिंह राशीतून तो कन्या राशीत प्रवेश करणार आहे. ग्रहामधील हा बदल काही राशीसाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे तर काही राशींवर याचा काही प्रमाणात नकारात्मक परिणाम होणार आहे. असं म्हटलं जातं की सूर्याची स्थिती योग्य असल्यास संबंधीत राशीच्या व्यक्तींना सुख समृद्धी येते. मान-सन्मानात वाढ होते. मेष, सिंह आणि धनु राशीसांठी सूर्याचा होणारा बदल सकारात्मक परिणाम घेऊन येणार आहे.
मेष : मेष राशीच्या लोकांसाठी कन्या राशीतील सूर्यांचे संक्रमण लाभदायक असणार आहे. मेष राशींच्या व्यक्तीची बुद्धिमत्ता आणी वाणी महत्वाची भूमिका बजावतील. तुमच्या वर्कृत्वाने विरोधकांवर नियंत्रण ठेऊ शकाल. न्यायालयीन खटल्यांचा निर्णय तुमच्या बाजूने येईल. प्रशासकीय क्षेत्रातील लोकांना पदोन्नतीचा योग आहे. हा काळ तुमच्या आरोग्याशी लाभदायक आहे .
धनु : कन्या राशीतील सूर्यांचे संक्रमन धनु राशीसाठी यश व कीर्ती मिळून देणारे आहे . व्यवसायिक क्षेत्राशी निगडित व्यक्तींना प्रचंड नफा मिळेल. कामाच्या ठिकाणी केलेले धाडस योग्य ठरणार आहे. तसेच सरकारी नोकरदारांसाठी हा प्रगतीचा कालावधी आहे. या सर्वांमध्ये धनु राशीतील व्यक्तींनी आपल्या अधिष्ठानांचा आदर करावा.
सिंह : सिंह राशीसाठी कन्या राशीतील सूर्याचा प्रवेश हा फलदायी असेल. विविध ठिकाणाहून गमावलेले पैसे अथवा संपत्ती परत मिळण्याचे संकेत आहेत. बुद्धिमत्ता आणि वर्कृत्वाचा वापर करून तुमच्या कार्यक्षेत्रात प्रचंड यश मिळवाल. संपत्ती वाढीचे शुभ संकेत दिसून येतील.