राशींनुसार घरात गणपती बाप्पाची करा स्थापना, लाभेल सुख-शांती!

मित्रानो, गणेशोत्सव केवळ भारतातच नाही तर परदेशात देखील मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. गणपतीला विघ्नहर्ता असेही म्हणतात. कारण ते आपल्या भक्तांचे दु:ख दूर करतो. घरात सुख-समृद्धी आणतो.

यंदा गणेशोत्सव १९ सप्टेंबरला साजरा केला जाणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार राशीनुसार गणपतीची मूर्ती बसवली आणि त्यानुसार अन्नदान केले तर जीवनातील सर्व संकटे दूर होतात. तर जाणून घ्या कोणत्या राशीच्या लोकांनी कोणती मुर्ती बसवावी.

मेष राशी
या राशीच्या लोकांनी घरी गणपती बाप्पाची गुलाबी किंवा लाल रंगाची मूर्ती आणवी. तसेच लाडू अर्पण केल्यास कामातील अडथळे दूर होतील. घरातील दुख: दूर होतील.

वृषभ राशी
या राशीच्या लोकांनी आपल्या घरी लाइट पिवळ्या रंगाची गणपतीची मुर्ती आणावी. बाप्पाला मोदक अर्पण करावे. यामुळे घरात आणि जीवनात सुख-समृद्धी येईल.

मिथुन राशी
या राशीच्या लोकांनी घरात लाइट हिरव्या रंगाची गणेशाची मूर्ती स्थापन करावी. नंतर मोदक अर्पण करावे. असे केल्याने भक्ताला बुद्धी आणि शक्ती प्राप्त होईल. घरातील नकारात्मकता आणि समस्या दूर होतील.

कर्क राशी
गणपतीची पांढऱ्या रंगाची मूर्ती स्थापन केल्यास या राशीच्या लोकांच्या सर्व समस्या दूर होतील. घरात सुख-शांती कायम राहील. नोकरीत प्रगती होईल.

सिंह राशी
या राशीच्या लोकांनी भगव्या रंगाचा गणेश मु र्आती स्थापन केल्यास त्याची प्रतिष्ठापना करावी आणि पिवळ्या बुंदीचे लाडू अर्पण करावेत. यामुळे आर्थिक समस्या दूर होतील.

कन्या राशी
या राशीच्या लोकांनी डार्क हिरव्या रंगाची गणेशमूर्ती स्थापन करावी. केशरी रंगाचे लाडू अर्पण करावे. यामुळे बिझनेसमध्ये अधिक फायदा मिळेल.

तूळ राशी
घरात आकर्षक, सुंदर आणि चमकणारी मूर्ती आणावी. सुंदर सजावट करावी. मोदक आणि लाडू अर्पण करावे. यामुळे घरातील सदस्यांची प्रगती होईल.

वृश्चिक राशी
गणपती बाप्पाची मूर्ती लाल आणि पांढरे धोतर नेसुन असलेली मुर्ती आणावी. ज्याच्या हातात लाल कमळ आहे. त्यांना गुलाबाच्या फुलांनी सजवावे. बिझनेसमध्ये प्रगती होईल.

धनु राशी
ज्या मूर्तीमध्ये पिवळे आणि केशरी रंग जास्त वापरले जातात. गणेशजींच्या हातात पिवळे लाडू असतात अशी मुर्ती या राशीच्या लोकांना स्थापन करावी.

मकर राशी
डार्क रंगाची गणेशमूर्ती घरात आणावी. त्यांना रोज जास्वंदाची फुल अर्पण करावी. घरातील अडथळे दूर होतील, पैशासंबंधित समस्या दूर होतील.

कुंभ राशी
या राशीच्या लोकांनी अशी मूर्ती आणावी ज्यामध्ये श्रीगणेश उभे आहेत आणि त्यांनी निळ्या रंगाचे धोतर परिधान केले आहे. त्यांना बेसनाचे लाडू अर्पण करावेत. घरातील अनेक समस्या दूर होतील.

मीन राशी
या राशीच्या लोकांनी गणपतीला दररोज दुर्वा अर्पण कराव्यात. पिवळ्या रंगाची मिठाई आणि लाल रंगाचे फुले अर्पण करावे. घरातील सदस्यांवर कायम कृपा राहिल.

Leave a Comment