दहावीचा निकाल २ जूनला जाहीर होणार; कधी, कुठे व किती वाजता पाहाल रिझल्ट?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) दिलेल्या माहितीनुसार उद्या म्हणजेच २ जून २०२३ ला इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. २ जूनला दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. प्राप्त माहितीनुसार mahahsscboard.in वर ऑनलाईन पाहता येईल. याशिवाय mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर देखील निकाल उपलब्ध असेल.

दहावीचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट
१) http://www.mahresult.nic.in
२) http://sscresult.mkcl.org

३) https://ssc.mahresults.org.in

असा पहा १०वी चा निकाल

१) दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वात आधी mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइट वर जा

२) दहावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.

३) तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरा. (आईचे नाव)

४) दहावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

५) निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा.

महाराष्ट्र बोर्डाच्या १० वीच्या मार्कशीटमध्ये विद्यार्थ्याचे नाव, शाळा क्रमांक, केंद्र क्रमांक, आईचे नाव, प्रत्येक विषयात मिळालेले गुण, एकूण गुण आणि टक्केवारी, पात्रता स्थिती यांचा समावेश असेल. जे विद्यार्थी महाराष्ट्रात दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाले त्यांना पुरवणी परीक्षेला बसावे लागेल.

राज्य मंडळाने इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली. दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते. त्यात ८ लाख ४४ हजार ११६ मुले आणि ७ हजार ३३ हजार ०६७ मुलींचा समावेश होता.राज्यभरातील ५ हजार ३३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती. दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याची उत्सुकत होती. मात्र, आता निकालाची तारीख जाहीर झाली आहे. २ जूनला निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर जाऊन निकालाची ऑनलाईन प्रिंटआऊट काढून घेता येणार आहे.

Leave a Comment