ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळ ग्रह शौर्य, पराक्रम, वीरतेचे कारक मानले जाते. यामुळे मंगळ ग्रहाच्या मार्गक्रमणाचा अनेकांवर प्रभाव पडतो, असे म्हणतात. मंगळ ग्रहाने नुकताच कर्क राशीत प्रवेश केला आहे.कर्क राशीत मंगळ ग्रह कमी प्रभावी मानला जातो.
ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रह १ जुलैपर्यंत कर्क राशीत विराजमान आहे, ज्याचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर होणार आहे. मात्र तीन राशींना या काळात मोठा धनलाभ होणार असल्याचे मानले जात आहे. जाणून घेऊ या त्या तीन राशी कोणत्या?
मेष राशी
ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रहाचा कर्क राशीमध्ये प्रवेश मेष राशीसाठी शुभ असू शकतो कारण मंगळ ग्रहाने चतुर्थ भावात मार्गक्रमण केले आहे, ज्याला संपत्ती किंवा लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार या काळात मेष राशींच्या लोकांना संपत्ती मिळू शकते आणि माता लक्ष्मीचा या राशीवर विशेष आशीर्वाद असणार, असे मानले जात आहे.
कर्क राशी
मंगल ग्रहाच्या राशीचे मार्गक्रमण कर्क राशींच्या लोकांसाठी लाभदायक मानले जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मंगल ग्रह कर्क राशीत लग्न भावामध्ये प्रवेश करीत आहे, त्यामुळे या काळात या राशींच्या लोकांवर सकारात्मक प्रभाव दिसून येणार, असे म्हणतात. या राशींच्या लोकांची आर्थिक स्थितीसुद्धा सुधारू शकते, असे मानले जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या लोकांना पैसा कमावण्याची नवनवीन संधी मिळू शकते.
तूळ राशी
ज्योतिषशास्त्रानुसार तूळ राशीच्या लोकांना मंगल ग्रहाचे मार्गक्रमण शुभ फळ देणारे ठरू शकते. मंगळ ग्रह तूळ राशीच्या गोचर कुंडलीच्या दशम भावामधून मार्गक्रमण करीत आहे. यामुळे या काळात तूळ राशीच्या लोकांना व्यवसायात यश मिळू शकते आणि मोठा धनलाभ होऊ शकतो, असे मानले जात आहे.
अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष केंद्राशी संपर्क साधावा. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.