शनिवारी या गोष्टींचे करा दान , क्रोधीत झालेले शनी होतील शांत!

मित्रानो, शनिवारचा दिवस शनिदेवाला समर्पित असतो. शनि देवाची कृपा असेल तर व्यक्तीचे कोणतेच काम थांबून राहत नाही. तेच जर शनि अशुभ स्थितीत असेल तर अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते. कामांमध्ये यश मिळत नाही. म्हणूनच शनिवारी शनिला प्रसन्न करण्याचे अनेक उपाय आहेत. शनिवारी केलेल्या या उपायांनी सगळ्या अडचणी दूर होतात. जाणून घेऊया ते उपाय कोणते आहेत ते.

या वस्तूंचं करावं दान जर तुम्ही शनिच्या साडेसातीने त्रासलेले असाल तर सकाळ-सकाळी पंचामृतात काळे तीळ घालून शंकाराला अर्पण करावे. आणि कष्ट निवारणाची प्रार्थना करावी. शनिवारी या उपायाने शनि ग्रह शांत होतो. शनिवारी असाह्य, म्हाताऱ्या व्यक्तीस अन्नदान करावे.

यामुळे शनिदेवाची कृपा मिळते. शनिची पिडा असेल तर सरसोच्या तेला आपला चेहरा बघून एखाद्या गरजूला ते तेल दान करावे. असं केल्याने शनिचा कोप कमी होतो.शनिवारी गरजू व्यक्तीला काळ्यारंगाचे कपडे, ब्लँकेट, लोकरीचे कपडे दान करावे.

चप्पल, बूट दान केल्याने शनिदेवाची विशेष कृपा प्राप्त होते.शिवाय काळे उडीद, काळे तीळ, सरसो तेल, काळे फळ, काळ्या रंगाच्या वस्तू दान केल्याने शनिदोषातून मुक्ती मिळते.शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे.

गव्हाच्या पिठाचे दिवे आणि अगरबत्ती लावून मनोभावे नमस्कार करावा. हा उपाय शनिवारी संध्याकाळी करावा.शनिच्या दुष्प्रभावातून वाचण्यासाठी रोज सकाळी लवकर उठावे. मांसाहर, मदिरा प्राशन करू नये, चुकीचे काम करू नये, चारित्र्यावर विशेष लक्ष द्यावे.

Leave a Comment