मित्रानो आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक रूढी परंपरा ह्या पूर्वीपासूनच चालत आलेल्या आहेत. अनेक सण उत्सव अगदी आनंदाने साजरे केले जातात. प्रत्येक सणाचे विशेष असे महत्त्व सांगितले गेलेले आहे. आपल्यापैकी बरेच जण हे गणपती बाप्पांचे भक्त आहेत. अनेक प्रकारचे व्रत, पूजा ते करीत असतात.
नुकतेच रक्षाबंधन, दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी झाली. आता सर्वांना बाप्पाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. सार्वजनिक मंडळातील बाप्पा मंडप सजावटीसाठी आधीच मंडपातून बाहेर पडू लागले आहेत. तर घरगुती गणपती घरी येण्यासाठी भाविकांना आणखी थोडे दिवस वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान बाप्पाच्या मुर्तीसंदर्भातील एक अत्यंत महत्वाची बाब आपण जाणून घेणार आहोत.
घरी आणत असलेल्या गणपती बाप्पाच्या मुर्तीची सोंड कोणत्या दिशेला असावी? याविषयी आज आपण जाणून घेऊया. जेणेकरुन आपणाला याचे शुभ फळ प्राप्त होईल.
तर 19 सप्टेंबर 2023 रोजी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्ष चतुर्थीला साजरी केली जाणार आहे. इथून पुढे 10 दिवसांचा गणेशोत्सव सुरू होणार आहे. तर 28 सप्टेंबर 2023 रोजी बाप्पाचे विसर्जन होणार आहे.
गणेश चतुर्थी 2023 ला तुम्हीही गणपती बाप्पा तुमच्या घरी आणण्याआधी काही गोष्टी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. सध्या बाजारात अनेक प्रकारच्या बाप्पाच्या मूर्ती येऊ लागल्या आहेत. आता चांद्रयान मोहिमेची चर्चा सुरु असताना चंद्रावरील सुंदर मुर्ती पाहायला मिळत आहेत. दरम्यान कोणत्या प्रकारची मुर्ती घरी आणावी? याबद्दल जाणून घेऊया.
भगवान शंकराने हत्तीचे डोके गणेशावर ठेवले तेव्हा सोंड योग्य दिशेने होती. या आसनात त्यांनी लक्ष्मीला नमस्कार केला, असे पुराणात सांगितले आहे.
डाव्या बाजूला सोंड असलेली मूर्ती शुभ मानली जाते आणि ती घरी आणल्याने भक्तांचे सर्व दुःख दूर होतात. घरात सुख-शांती नांदण्यासाठी डाव्या सोंडेची बाप्पाची मूर्ती बसवावी, असे पुराणात म्हटले आहे.
उजव्या बाजूला सोंड असलेली गणेशमूर्ती घरी आणू नये. अशा मूर्तीची प्रतिष्ठापना घरात करू नये, असे सांगितले जाते. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशमूर्तीच्या सोंडेच्या दिशेसह अनेक गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक असते. पुढे याबद्दल जाणून घेऊया.
बाप्पाच्या मूर्तीचे तोंड दक्षिण दिशेला नसावे. या दिशेला मूर्तीची स्थापना करू नये. बाप्पाच्या स्थापनेसाठी सर्वोत्तम दिशा ईशान्य मानली जाते.
तुम्ही एकादा बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली की त्यानंतर सिंहासन बदलू नये. तसेच दिवा लावण्याची जागाही बदलू नये. गणेशोत्सव काळात पूजा एकाच ठिकाणी करावी.
बाप्पाच्या स्थापनेनंतर त्याच्यासोबत नेहमी कोणीतरी असायला हवे. तसेच गणपती उत्सवात मन, कृती आणि विचार शुद्ध राहिले पाहिजे. तुम्ही सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे.