स्वामींची नित्य सेवा नाही जमल्यास काय करावे?

मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे स्वामींचे भक्ती सेवेकरी आहेत. केंद्रामध्ये जाऊन स्वामींची सेवा आपण करीत असतो. स्वामींच्या अनेक मंत्रांचा जप देखील करत असतो. तसेच स्वामी आपल्या सदैव पाठीशी राहावे, आपली संकटे दूर करावी त्यासाठी आपण अनेक स्वामींच्या सेवा देखील करत असतो. परंतु अनेक जणांना वेळेअभावी करणे शक्य होत नाही. म्हणजेच केंद्रामध्ये जाणे शक्य होत नाही. तर तुम्ही स्वामींची नित्य सेवा नाही जमल्यास काय करावे? याविषयीची आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

तर आपले स्वामी हे भक्तीचे भुकेले आहेत. आपल्या घरात जर स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर प्रत्यक्ष स्वामीच घरात वास करत असल्याचा अनुभव येतो. घरात वडीलधाऱ्यांचा आधार आहे असे वाटते. भीती मनात रहात नाही. राहीलच कशी कारण आपल्या स्वामींचे ब्रीद वाक्यच आहे की, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.

मग भीतीला जागाच उरणार नाही ना ?स्वामी परम दयाळू आणि कृपाळू आहेत. आपल्या हाकेला ते धावून येतातच येतात. अनेकांचे अनुभव आहेत तसे. त्यामुळे स्वामी जवळ जाण्याचा आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्याचा सगळ्यात सोपा, साधा, सरळ, महत्त्वाचा आणि उत्तम मार्ग म्हणजे स्वामींचा ” श्री स्वामी समर्थ ” हा षडाक्षरी म्हणजेच सहा अक्षरी मंत्रजप करणे हा होय.

बाकी सेवा जमली नाही तरी चालेल पण सतत श्री स्वामी समर्थ हा मंत्रजप मात्र अतिशय श्रद्धापुर्वक करणे गरजेचे आहे. यासाठी जपमाळ हातात असायला हवी.

तुम्हाला बाकी सेवा जमली नाही तरी चालेल पण सतत श्री स्वामी समर्थ हा मंत्रजप मात्र अतिशय श्रद्धापुर्वक करणे गरजेचे आहे. यासाठी जपमाळ हातात असायला हवी किंवा तुम्ही मूर्ती समोर किंवा फोटो समोर बसून रहाणे गरजेचे आहे असे काहीही नियम अटी नाहीत.

अगदी हिंडत फिरत, कामे करत जरी तुम्ही हा जप केलात तरी चालेल पण त्यासाठी विश्वास आणि श्रद्धा फक्त महत्त्वाची. कारण हा मंत्र म्हणजे पूर्ण परब्रह्म स्वरूप आहे, संजीवनी आहे आयुष्याची अशी धारणा मनात ठेवून आपण या मंत्राशी एकरूप झालो पाहिजे, गुंतून राहिले पाहिजे.

Leave a Comment