मित्रानो, वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजकुमार बुध लवकरच आपली स्थिती बदलणार आहे. बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, संवाद, गणित, हुशारी आणि मैत्रीचा दाता बुध उदय होणार आहे. या परिणाम 12 राशींवर दिसून येणार आहे. काही राशींसाठी तो सकारात्मक तर काही राशींसाठी तो नकारात्मक ठरणार आहे. बुध उदय 15 सप्टेंबरला सिंह राशी पहाटे 4:28 वाजता गोचर करणार आहे. त्यामुळे काही राशींचं भाग्य चमकणार आहे, याच तुमच्या राशीचा समावेश आहे का जाणून घ्या.
मेष राशी
बुध उदय हे सिंह राशीत होणार असून मेष राशींच्या मंडळींसाठी हा शुभ ठरणार आहे. या लोकांना अचानक धनलाभ होणार आहे. तुमचे पैसे जिथे अडकलेले असतील तर ते तुम्हाला परत मिळणार आहे. समाजात आणि कामाच्या ठिकाणी तुमचं मान सन्मान वाढणार आहे. नोकरी बदलासाठी हा उत्तम काळ आहे. मुलांकडून आनंदाची बातमी मिळणार आहे. मालमत्ता किंवा वाहन खरेदीचे योग आहेत.
सिंह राशी
सिंह राशीच्या लोकांना वडिलोपार्जित मालमत्तेत नफा मिळणार आहे. तुमच्या आतापर्यंतच्या कठोर परिश्रमाला यश मिळणार आहे. आर्थिक फायदा तुम्हाला होणार आहे. तुमचा आत्मविश्वास या काळात वाढणार आहे. मालमत्ता आणि वाहन खरेदीचे योग आहेत. अचानक धनलाभ झाल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती बदलणार आहे. नवीन काम सुरु करण्यासाठी हा काळ उत्तम असणार आहे.
मिथुन राशी
मिथुन राशीच्या लोकांसाठी बुधाचा उदय खूप शुभ असणार आहे. या राशीच्या लोकांना धैर्य, शौर्य, कार्यक्षेत्र, वडिलोपार्जित संपत्ती यात तुम्हाला यश मिळणार आहे. अडकलेले पैसे परत मिळणार आहे. सामाजिक आणि व्यावसायिक प्रतिष्ठा वाढणार आहे. तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर ही वेळ तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. व्यावसायिकांना आर्थिक लाभ मिळणार आहे.
कुंभ राशी
सिंह राशीत बुधाचा उदय कुंभ राशीसाठी खूप जास्त भाग्यशाली ठरणार आहे. या काळात या मंडळींना प्रगती, यश आणि आनंद द्विगुणीत करणार आहे. विवाहितांसाठीही हा काळ उत्तम असणार आहे. वैवाहिक जीवनात बुध उदय आनंद आणि सुख घेऊन येणार आहे. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना या काळात चांगला नफा मिळणार आहे. मुलांची प्रगती पाहून तुम्ही आनंदी होणार आहात. याशिवाय तुम्हाला अचानक धनलाभ होणार आहे.
कर्क राशी
बुधाचा उदय कर्क राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे. या काळात तुम्ही एखादे वाहन किंवा मालमत्ता खरेदी करणार आहात. नवीन नोकरी किंवा काम सुरू करण्यासाठीही ही वेळ तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. नोकरी-व्यवसायात यश मिळणार असून तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. तुम्हाला मौल्यवान वस्तू खरेदी करण्याची संधी आहे. हा काळ नवीन कामासाठी शुभ आहे. या काळात तुमचं धैर्य आणि शौर्य वाढणार आहे. तसंच तुम्ही पैसे बचत करण्यात यशस्वी होणार आहात.