मित्रानो,अनेकदा तुम्ही लोकांना पूजा करताना मंत्रोच्चार करताना पाहिलं असेल. पूजा करताना मंत्राचा उच्चार केल्यानं देव लवकर प्रसन्न होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. सनातन धर्मात मंत्रजप करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
जर व्यक्ती नियमितपणे देवाच्या मंत्रांचा जप करत असेल तर घरात सकारात्मक ऊर्जा संचारते. कुटुंबात अनेक चांगले बदल पाहायला मिळतात. ज्योतिषशास्त्रातही मंत्रांच्या जपाने अनेक समस्या दूर होतात, असे सांगितले आहे. वेगवेगळ्या समस्यांवर मात करण्यासाठी वेगवेगळ्या देवी मंत्रांचा जप करावा.बरेचदा असं घडतं की, आपलं एखादं होता-होता बिघडतं किंवा कधी-कधी महत्त्वाच्या परीक्षांमध्ये घरातील मुलांना यश मिळत नाही.
त्यामुळे घरातून बाहेर पडण्यापूर्वी कामात यश मिळवून देणाऱ्या काही महत्त्वाचे मंत्र जरूर जपावेत. असे केल्यास प्रत्येक कामात यश मिळेल.नामस्मरण महत्वाचे का?हिंदू धर्मात मंत्रांचा जप खूप महत्त्वाचा मानला जातो. मंत्रोच्चार केल्यानं देव लवकर प्रसन्न होतात. जर एखाद्या व्यक्तीने नियमितपणे मंत्रांचा जप केल्यानं जीवनात सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते.
धन्य-धान्यही वाढते. गणपती बाप्पा हा सर्व देवतांमध्ये पहिला पूजनीय मानला जातो. सनातन धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी विधीनुसार गणपतीची पूजा केली जाते. त्यामुळे कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते. कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी घरातून बाहेर पडण्यापूर्वी गणेशाची पूजा करावी आणि ‘श्री गणेशाय नमः’ मंत्राचा किमान 11 वेळा जप करावा.
यामुळे कामातील अडथळे दूर होतील आणि तुम्हाला यश मिळेल. सुख-सुविधांचा कारक ॐ ऐं श्रीं भाग्योदयं कुरु कुरु श्रीं ऐं फट्
हा भाग्यनोत्ती मंत्र मानला जातो. ज्याचा जप केल्यानं निद्रिस्त भाग्य जागृत होते.
तसेच, त्याचा नियमित जप केल्यानं जीवनात सकारात्मकता आणि सुख-शांती येते.राम लक्ष्मणौ सीता च सुग्रीवों हनुमान कपि ।पञ्चैतान स्मरतौ नित्यं महाबाधा प्रमुच्यते ।।हा प्रभू श्रीरामाचा मंत्र आहे. कामात यश मिळवण्यासाठी आणि अनेक प्रकारचे अडथळे दूर करण्यासाठी तुम्ही या मंत्राचा जप करू शकता.