मित्रानो आज जन्माष्टमीला तब्बल 30 वर्षांनंतर दुर्मिळ असा योग जुळून आला आहे. ज्या नक्षत्रात आणि ज्या वाराला श्री कृष्णाचा तोच योग आज जुळून आला आहे. आज रोहिणी नक्षत्र आणि बुधवार असल्याने आज जयंती योग आहे. शिवाय हिंदू पंचांगानुसार सर्वार्थ सिद्धी आणि रवियोगही आहे. त्यासोबतच चंद्र वृषभ राशीत आहे. तर तब्बल 30 वर्षांनंतर कर्माचा दाता शनिदेव कुंभ राशीत विराजमान आहे.
आज अष्टमी तिथी 6 सप्टेंबरला दुपारी 03:37 वाजता सुरू होणार असून ती उद्या गुरुवारी 7 सप्टेंबरला दुपारी 04:14 पर्यंत आहे. मुंबईसह अनेक शहरांमध्ये गुरुवारी 7 सप्टेंबरला दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. एकंदरीत ग्रह आणि नक्षत्राचा खेळ पाहिल्यास वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जन्माष्टमी काही राशींसाठी वरदान ठरणार आहे.
मकर राशी
मकर राशीच्या लोकांवर श्रीकृष्णाची विशेष कृपा बरसणार आहे. या राशींच्या लोकांसाठी जन्माष्टमी फायदेशीर ठरणार आहे. शनि तुमच्या राशीतून धन घरात गोचर करत असल्याने तुम्हाला अचानक धनलाभ होणार आहे. तुम्हाला आतापर्यंत केलेल्या मेहनतीचं फळं मिळणार आहे. तुमच्या सर्व इच्छा या काळात पूर्ण होणार आहे. व्यावसायिकांना गुंतलेले पैसे परत मिळणार आहे. नोकरादारांसाठीही हा काळ उत्तम असून तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे.
सिंह राशी
30 वर्षांनंतर विशेष योगामुळे सिंह राशीच्या मंडळींना अतिशय लाभ होणार आहे. तुमच्या उपजीविकेच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. त्याशिवाय तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. तुम्हाला जोडीदाराकडून मदत आणि सहकार्य लाभणार आहे. नशिबाची साथ तुम्हाला लाभणार आहे. प्रलंबित कामं मार्गी लागणार आहे. ठोस निर्णय घेण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. पाटर्नशीपच्या कामात फायदा होईल.
वृषभ राशी
वृषभ राशीच्या मंडळींसाठी जन्माष्टमी विशेष फलदायी ठरणार आहे. यावेळी तुम्हाला अनपेक्षित धनलाभाची शक्यता आहे. त्यासोबतच तुमच्या आयुष्यात पैसे कमावण्याच्या अनेक संधी निर्माण होणार आहात. तुमचा स्वतःचा व्यवसाय असल्यास तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे. या काळात तुमचा व्यवसाय वाढणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेत यश प्राप्त होणार आहे.