यंदा 19 सप्टेंबरला बाप्पा येणार घरी! मूर्तीची स्थापना करताना लक्षात घ्या या काही गोष्टी

मित्रानो, हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या महिन्यात विविध सण साजरे केले जातात. तर, श्रवणामागून येणारा भाद्रपदही अनेक सण-उत्सव घेऊन येतो.

भाद्रपदाच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेशोत्सव साजरा केला जातो. आज भारतातच नाही, तर जगभरात विविध ठिकाणी गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होतो. या दिवसांत बाप्पाच्या मूर्तीची अत्यंत विधिवत स्थापना करून पूजा केली जाते. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात बाप्पाच्या पूजेने केली जाते. पुराणांमध्ये दिलेल्या माहितीनुसार, भाद्रपद शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला भगवान गणेश कैलास पर्वतावरून जमिनीवर राहायला येतात.

म्हणूनच भाविक बाप्पाची मूर्ती घरोघरी स्थापित करून त्याचा विधिवत पाहुणचार करतात. राधा-कृष्णाचं 300 वर्ष प्राचीन मंदिरज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा गणेश चतुर्थीला 18 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 12 वाजून 39 मिनिटांनी सुरुवात होईल. तर, 19 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 01 वाजून 43 मिनिटांनी चतुर्थी समाप्त होईल. त्यामुळे भाविक 19 सप्टेंबरला सकाळी 11 वाजून 07 मिनिटे ते दुपारी 01 वाजून 34 मिनिटे या शुभमुहूर्तावर आपल्या घरात किंवा सार्वजनिक मंडळात बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करू शकतात. त्यानंतर 10 दिवस आपण अत्यंत उत्साहाने बाप्पाचा पाहुणचार करू.

दरवर्षी हे 10 दिवस घरोघरी प्रसन्न वातावरणाचे असतात. तर, यंदा 28 सप्टेंबरला आपण बाप्पाचं विधीवतरित्या विसर्जन करू शकतो. जन्माष्टमीबाप्पाच्या स्थापनेवेळी काही नियम लक्षात असू द्या. बाप्पाच्या डाव्या सोंडेच्या मूर्तीची स्थापना करावी. अशा मूर्तीमुळे घरात सुख, समृद्धी येते.

शिवाय आपल्याला यश मिळतं. बाप्पाचं आवडतं खाद्यपदार्थ म्हणजे मोदक आणि त्याचं वाहन म्हणजे उंदीर. त्यामुळे बाप्पाची मूर्ती आणताना, त्याच्या हातात मोदक आहे आणि सोबत उंदीर आहे, याची खात्री करून घ्या. अशा मूर्तीमुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

बाप्पाची लाल रंगाची मूर्ती आणल्यास घरात सुख, समृद्धी नांदते. तर, पांढऱ्या रंगाची मूर्ती आणल्यास घरात शांतता प्रस्थापित होते.- बाप्पाचं तोंड उत्तर दिशेला असेल, अशाच स्थितीत मूर्तीची स्थापना करा. याचं कारण म्हणजे उत्तर दिशेत भगवान शंकर आणि लक्ष्मी देवीचा वास असतो, असं मानलं जातं.

Leave a Comment