उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमीला करा हे उपाय, अपूर्ण इच्छा होतील पूर्ण!

मित्रानो, श्रावण महिन्यातील तिसरा सण म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी. श्रावण महिन्यातील कृष्ण सप्तमीला श्रीकृष्ण जयंती साजरी केली जाते. त्याच्या दुसऱ्या दिवशी अर्थात अष्टमीला गोपाळकाला असतो.

हिंदू पंचागानुसार यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमीला ग्रहांच्या संयोगामुळे तब्बल ३० वर्षांनंतर शुभ संयोग तयार झाला आहे. रवियोग आणि सर्वार्थ सिद्धी योग एकाच वेळी तयार होत आहेत.

ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी रोहिणी नक्षत्र असून चंद्र वृषभ राशीत असेल. जन्माष्टमीच्या दिवशी ही दुर्मिळ योग असेल. यामुळे सर्व 12 राशींसाठी हा काळ शुभ असणार आहे. कान्हाच्या कृपेने या दिवशी लोकांची सर्व रखडलेली कामे पूर्ण होतील.

धार्मिक विद्वानांच्या मते, श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी काही खास करणे खूप फायदेशीर आहे. जन्माष्टमीला श्रीकृष्णाचा पंचामृताने अभिषेक करावा. मग त्या पंचामृताचा प्रसाद म्हणून स्वीकार करा. यासोबतच जन्माष्टमीला सुक्या मेव्याची खीर बनवावी.

त्या खीरमध्ये तुळशीचे पान टाकून श्रीकृष्णाला अर्पण करा. तसेच श्रीकृष्णाला पंजिरी अर्पण करा. यामुळे भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होऊन आपल्या अपूर्ण इच्छा पूर्ण करतील. तसेच आरोग्य देखील चांगले राहिल.

Leave a Comment